भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ! मुलं दूध पित नसतील तर 'हे' पदार्थ खाऊ घाला..
Updated:February 8, 2025 14:26 IST2025-02-08T14:20:51+5:302025-02-08T14:26:23+5:30

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात.(5 veg calcium rich food other than milk)
अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळू शकेल (superfood for calcium). त्यातला पहिला पदार्थ आहे नाचणी. नाचणीच्या पिठाचे इडली, डोसा, पराठे असे वेगवेगळे पदार्थ करून मुलांना खाऊ घाला.
शेवग्यामधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. शेवग्याचं सूप किंवा शेवग्याची भाजी मुलांना द्यायला हवी.
भेंडीची भाजी हा बऱ्याच लहान मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. त्यामुळे मुलांना भेंडीची भाजी भरपूर खाऊ द्या. कारण भेंडीमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं.
भरपूर कॅल्शियम देणारा आणखी एक पदार्थ आहे तीळ. मुलांना गोड आवडत असेल तर तीळाचे लाडू, चिक्की असं खायला करून द्या. किंवा मग मुलं थोडी मोठी असतील तर तिळाची चटणी द्या.
रताळ्यांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर एरवीही तुम्ही रताळे खा आणि मुलांनाही खाऊ घाला. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांसाठीही रताळे खाणं चांगलं आहे.