५ शाकाहारी पदार्थांतूनही मिळेल भरपूर प्रोटीन, ताकद वाढेल लवकर आणि अशक्तपणाही होईल कमी
Updated:April 17, 2025 18:40 IST2025-04-17T16:14:37+5:302025-04-17T18:40:59+5:30

प्रोटीन्सची कमतरता अनेक महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसून येते. शाकाहारी लोकांच्या शरीरात तर प्रोटीन्सची कमतरता असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे.
त्यामुळे मग कित्येक लोक आहारावर लक्ष केंद्रित न करता प्रोटीन शेक किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतात. पण आपल्या घरातच असे काही पदार्थ असतात जे योग्य प्रमाणात नियमितपणे घेतले तर शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर होऊ शकते. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...
आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्या सांगतात की भोपळ्याच्या बिया हा प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहे. २८ ग्रॅम एवढ्या भाजलेल्या भोपळ्याच्या बियांमधून ५ ग्रॅम प्रोटीन्स तर मिळतातच. पण त्यासोबतच व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ॲण्टीऑक्सिडंट्सही मिळतात.
प्रोटीन्स मिळण्यासाठी मटारचे दाणेही खायला हवे. त्यातून फायबर, फोलेट, व्हिटॅमिन के देखील चांगल्या प्रमाणात मिळते.
क्विनोआमधूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. १ वाटीभर क्विनोआ खाल्ल्यास त्यातून ८ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
शिजवलेले छोले किंवा चणे जर तुम्ही वाटीभर खाल्ले तर त्यातूनही १५ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. याशिवाय त्यातून लोह आणि मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते.
शिजवलेल्या डाळींमधूनही प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज वाटीभर वरण किंवा आमटी तरी खायलाच हवी.