कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

Published:March 12, 2024 04:43 PM2024-03-12T16:43:04+5:302024-03-13T15:28:57+5:30

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते. अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, अशी माहिती आहारतज्ज्ञ कशिका भाटिया यांनी HT Digital शी बोलताना दिली

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम. व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स, इसेंशियल ऑईल यांनी परिपूर्ण असलेले बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेले आणि टरफलं काढून टाकलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

दुसरं म्हणजे अक्रोड. प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे अक्रोड पाण्यात किंवा दुधात ६ ते ८ तास भिजत घालावेत आणि त्यानंतर खावेत. स्ट्रेस लेव्हल कमी करून मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होण्यासाठीही अक्रोड फायदेशीर ठरतात.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

चिया सिड्समध्येही हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. मधुमेह असणाऱ्यांसाठीही चिया सिड्स फायदेशीर ठरतात. कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

ओट्समध्ये असणारे सोल्यूबल फायबर बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटिन्स आणि नॅचरल ग्लुकोज असणारे खजूर खाणंही हृदयासाठी उपयुक्त आहे.

कोलेस्टेरॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळा

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेल्या मनुका खाव्या.