6 must-have foods to boost a tired brain
मेंदूला तरतरी देणारे आणि ब्रेन फटिग घालवणारे ६ पदार्थ खा पोटभर, मेंदू होईल ताजातवानाPublished:January 6, 2024 09:55 PM2024-01-06T21:55:53+5:302024-01-08T13:45:51+5:30Join usJoin usNext मेंदूला सतत सक्रिय राहावा, त्याला चालना मिळावी यासाठी आपण सतत काही ना काही गोष्टी करत असतो. त्याचबरोबर आहारातूनही मेंदूचे पोषण होण्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा समावेश करावा ते पाहूया... बेरीज हा फळांमधीलच एक वेगळा प्रकार असून या बेरीज मेंदूसाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी हे त्यातील काही प्रकार असून आहारात त्यांचा समावेश करायला हवा. पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन्स असल्याने पालकही मेंदूसाठी अतिशय चांगला असतो. पालक पुरी, पालकाची भाजी, पालक भात अशा विविध स्वरुपात आपण पालक खाऊ शकतो. राजमा हा कडधान्यातील जास्त न खाल्ला जाणारा प्रकार पण यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यासोबतच इतरही बरेच पोषक घटक असल्याने राजमा अवश्य खायला हवा. जवस हा शाकाहारी लोकांसाठी ओमेगा ३ चा उत्तम स्त्रोत असून त्यामध्ये खनिजे, फायबर्स, फॅटी अॅसिडस असे इतरही बरेच घटक असतात. नटस म्हणजेच सुकामेव्याचा आहारात जरुर समावेश करावा, यामुळे मेंदूचे कार्य जास्त चांगले होण्यास निश्चितच मदत होते. ब्रोकोली ही प्रामुख्याने परदेशात खाल्ली जाणारी भाजी असली तरी ती भारतातही सहज उपलब्ध असते. प्रोटीन, कॅल्शियम यांचा उत्तम स्त्रोत असलेल्या ब्रोकोलीचा आहारात जरुर समावेश करावा. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाHealthHealth TipsHealthy Diet Plan