Join us   

मेंदूला तरतरी देणारे आणि ब्रेन फटिग घालवणारे ६ पदार्थ खा पोटभर, मेंदू होईल ताजातवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2024 9:55 PM

1 / 7
मेंदूला सतत सक्रिय राहावा, त्याला चालना मिळावी यासाठी आपण सतत काही ना काही गोष्टी करत असतो. त्याचबरोबर आहारातूनही मेंदूचे पोषण होण्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा समावेश करावा ते पाहूया...
2 / 7
बेरीज हा फळांमधीलच एक वेगळा प्रकार असून या बेरीज मेंदूसाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी हे त्यातील काही प्रकार असून आहारात त्यांचा समावेश करायला हवा.
3 / 7
पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन्स असल्याने पालकही मेंदूसाठी अतिशय चांगला असतो. पालक पुरी, पालकाची भाजी, पालक भात अशा विविध स्वरुपात आपण पालक खाऊ शकतो.
4 / 7
राजमा हा कडधान्यातील जास्त न खाल्ला जाणारा प्रकार पण यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यासोबतच इतरही बरेच पोषक घटक असल्याने राजमा अवश्य खायला हवा.
5 / 7
जवस हा शाकाहारी लोकांसाठी ओमेगा ३ चा उत्तम स्त्रोत असून त्यामध्ये खनिजे, फायबर्स, फॅटी अॅसिडस असे इतरही बरेच घटक असतात.
6 / 7
नटस म्हणजेच सुकामेव्याचा आहारात जरुर समावेश करावा, यामुळे मेंदूचे कार्य जास्त चांगले होण्यास निश्चितच मदत होते.
7 / 7
ब्रोकोली ही प्रामुख्याने परदेशात खाल्ली जाणारी भाजी असली तरी ती भारतातही सहज उपलब्ध असते. प्रोटीन, कॅल्शियम यांचा उत्तम स्त्रोत असलेल्या ब्रोकोलीचा आहारात जरुर समावेश करावा.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना