Join us   

इर्मजन्सी पिल्सविषयी ६ गैरसमज! पिल्स घेतल्या, नो रिस्क, बिनधास्त सेक्स लाइफ.. असं वाटतं तुम्हालाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 4:39 PM

1 / 8
१. गोळ्या घेतल्या की झालं काम.. खरंच एवढं सोपं असतं का ते? प्रेग्नन्सी टाळण्यासाठी इर्मजन्सी पिल्स घेत असाल तर त्याबाबतचे हे गैरसमज टाळलेच पाहिजेत.
2 / 8
२. आजकाल या गोळ्या घेण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. शिवाय या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही काहीच गरज नसते. मेडिकलमध्ये सहज या पिल्स उपलब्ध होतात. त्यामुळे अगदी महाविद्यालयीन तरुणींचंही या गोळ्या घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच तर गोळ्या घेण्याआधी त्याबाबत सविस्तर माहिती प्रत्येकीला हवीच..
3 / 8
३. या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज नसते, हा समज अनेकींना आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खरेतर कोणतीच औषधी कधीच घेऊ नयेत. त्यामुळे एकदा गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या.
4 / 8
४. असुरक्षित संबंध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या गोळ्या घ्याव्या, असा समज अनेकींना आहे. पण गोळ्या घेण्यासाठी तुम्हाला सकाळपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. ७२ तासांची मर्यादा पाळणे मात्र गरजेचे आहे.
5 / 8
५. गोळ्या घेतल्या की प्रेग्नन्सीचं टेन्शनच नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज. गोळ्या घेऊनही प्रेग्नन्सी राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे बिंधास्त गोळी घ्या आणि प्रेग्नन्सी टाळा, असं नसतं.
6 / 8
६. असुरक्षित संबंध झाले की प्रेग्नन्सी टाळण्यासाठी घ्या गोळी... असं वारंवार करत असाल तर सावधान. असं करणं तुमच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. त्यामुळे खूपच कधीतरी अगदी वर्षातून एखाद्या वेळी या गोळ्यांचा वापर करावा, असं गायनॅकोलॉजिस्ट सांगतात.
7 / 8
७. कधी कधी पाळी चुकली तर अनेक जणी या गोळ्या घेण्याचा विचार करतात. जेणेकरून आपोआप ॲबॉर्शन होऊन जाईल असं त्यांना वाटतं. पण मुळात या गोळ्या गर्भ राहू नये म्हणून असतात. जर गर्भ राहीला असेल तर या गोळ्या घेण्याचा कोणताही फायदा नाही. या गोळ्यांनी ॲबॉर्शन होईल, असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
8 / 8
८. ब्रेस्टचा आकार वाढावा, यासाठीही काही जणी इर्मजन्सी पिल्स घेतात. असं करणं अतिशय चुकीचं आहे. इर्मजन्सी पिल्स घेतल्याने शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या बदलांचा परिणाम होऊन स्तनांच्या आकारात वाढ होते, पण ती तात्पुरत्या स्वरूपाची असते. त्यामुळे स्तनांचा आकार वाढविण्याच्या उद्देशाने या गोळ्या घेत असाल, तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.
टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीहेल्थ टिप्स