1 / 8बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की ते कित्येक लहानसहान गोष्टीही विसरून जातात. पटकन कोणाचं नाव आठवत नाही (6 superfood for brain). आपल्याला घरी, ऑफिसमध्ये सांगितलेली गोष्टसुद्धा आपण विसरून जातो.(food that helps to increase brain power and memory)2 / 8असं होऊ नये म्हणून काही पदार्थ नियमितपणे खायला हवे असं डॉक्टर सांगतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयी डॉ. प्रवीण गुप्ता यांनी दिलेली माहित नवभारत टाईम्सने शेअर केली आहे. ते पदार्थ लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठीही नक्कीच उपयुक्त ठरतील. 3 / 8त्यापैकी पहिल्या क्रमांकावर आहे ब्राऊन राईस, जव, क्विनोआ यासारखे धान्य. आपल्या मेंदूला उर्ज देण्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात असे डॉक्टर सांगतात.4 / 8दुसरे आहे पालक. पालकाची भाजी, सूप, पराठे यामाध्यमातून पालक खायला हवे.5 / 8स्मरणशक्ती वाढवून विसराळूपणा कमी करण्यासाठी ब्रोकोलीसुद्धा अतिशय उपयुक्त ठरते. पण अजूनही बऱ्याच कुटूंबामध्ये ती नियमितपणे केली जात नाही.6 / 8हळदीमध्ये असणारे करक्युमिन मेंदूच्या पेशींना ॲक्टीव्ह ठेवण्यास मदत करतात. न्युरॉन्सचे काम अधिक चांगले होण्यासाठीही त्यांची मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात.7 / 8बदाम, अक्रोड यासारख्या सुकामेव्यातून हेल्दी फॅट्स, ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात मिळतात. तसेच त्यांच्यातून ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिडसुद्धा मिळते.8 / 8बुद्धी चांगली राहण्यासाठी दूधसुद्धा नियमितपणे प्यावे. त्यातून मेंदूसाठी तसेच सगळ्या शरीरासाठीच पोषक ठरणारे व्हिटॅमिन्स, खनिजे चांगल्या प्रमाणात मिळतात.