Join us   

इम्युनिटी वाढविण्यासाठी माधुरी दीक्षित खाते ६ पदार्थ- बघा तिचे पती डॉ. नेने यांचा खास सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 3:36 PM

1 / 8
पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले असते (health care tips for monsoon). त्यामुळे या दिवसांत आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. (6 superfood to boost your immunity)
2 / 8
इम्युनिटी म्हणजेच राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काेणते पदार्थ खायला पाहिजेत, याविषयीचा व्हिडिओ अभिनेत्री माुधरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुपरफूड ठरणारे ६ पदार्थ सांगितले आहेत. (actress Madhuri Dixit's husband Dr. Shriram Nene suggests how to boost immunity)
3 / 8
त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे हळद. हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. हळदीचं दूध, हळदीचा काढा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
4 / 8
दुसरा पदार्थ आहे लाल रंगाची सिमला मिरची. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे त्वचा, डोळ्यांचे आरोग्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्या मिरचीचा उपयोग होतो.
5 / 8
तिसरा पदार्थ आहे आलं. आलं आपल्या आहारात नियमितपणे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणावर असतात.
6 / 8
लिंबूवर्गीय फळांमधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे संत्री, मोसंबी, किवी, अननस अशी फळं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात.
7 / 8
राेगप्रतिकारक शक्ती वाढविणारं नॅचरल सुपरफूड म्हणून योगर्ट ओळखलं जातं. योगर्ट नियमित खाल्ल्यामुळे पचनक्रियाही चांगली होते.
8 / 8
पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही पालक उपयुक्त ठरतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समाधुरी दिक्षितमोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण