शहाळ्यातलं पाणी प्या-मलई खा पोटभर! ५० रुपयांचं शहाळं देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे...
Updated:March 7, 2025 19:02 IST2025-03-07T18:40:13+5:302025-03-07T19:02:53+5:30
Coconut Malai Benefits : Why you should eat coconut malai : 7 Health Benefits of Coconut Malai in Summer : 7 benefits of eating tender coconut meat : शहाळ्यातील मलई अनेकदा खाल्ली पण फायदे माहीतच नाही ?

उन्हाळ्यांत शहाळ्याचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु फक्त पाणीच नाही तर मलई खाणे देखील तितकेच उपयुक्त ठरते. शहाळ्याच्या या मलईत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अशी अनेक पोषक तत्व असतात.
नारळाच्या मलईमध्ये (Coconut malai) प्रथिने, तांबे आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक गुणधर्म असतात. नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. हे फायदे नेमके कोणते ते पाहूयात.
१. पचनक्रियेत सुधारणा :-
शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर जास्त असते. ही मलई खाल्ल्याने आपली पचनक्रिया निरोगी राहते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदच होते. मलई नियमितपणे खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते, ज्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
२. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी :-
शहाळ्याची मलई ही फॅटी अॅसिडयुक्त असते.ही मलई खाल्ल्याने आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. तसेच ही मलई लगेच ऊर्जा देण्यासाठीचा चांगला स्त्रोत आहे. शहाळ्याची मलई खाल्ल्याने सतत भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं जास्त खाणं याने कंट्रोल होतं आणि तुमचं वजन वाढत नाही.
३. त्वचेसाठी फायदेशीर :-
नारळाच्या मलईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतं. तसेच या व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. याचबरोबर, चेहऱ्यावर एक वेगळाच नॅचरल ग्लो येईल आणि वृद्धत्वाच्या खुणा कमी होतील.
४. प्रतिकारक शक्ती वाढते :-
शहाळ्यातील मलईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज यासारखी पोषक तत्वे खूप असतात. मलई ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. थोडक्यात आपली इम्युनिटी वाढते. त्यामुळे मलईचे सेवन केल्याने आपण स्वतःला अनेक आजारांपासून वाचवू शकतो.
५. शरीर थंड राहतं :-
नियमितपणे मलई खाल्यास उष्णेतपासून बचाव होतो. मलई खाल्याने आपल्याला खूप इन्स्टंट एनर्जी मिळते. मलई खाल्ल्याने शरीर थंड राहते. तसेच आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
६. इन्स्टंट एनर्जी :-
उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा कडक ऊन, आर्द्रता आणि घामामुळे थकवा जाणवत असेल, पण नारळ पाणी किंवा त्याच्या मलई खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा जलद गतीने वाढून, तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.
७. हृदय निरोगी ठेवते :-
शहाळ्याची मलई खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉलची पातळी वाढून, हृदयाशी संबंधित समस्यांना दूर ठेवते. त्याचबरोबर बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.