1 / 9घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आहाराकडे लक्ष देणाऱ्या महिला स्वतःच्या आहाराबाबत मात्र खूपच उदासीन असतात. उरलंसुरलं ते खायचं आणि पोटाची भूक भागवायची असं खूप जणींचं अंगदी रोजचंच आहे.2 / 9त्यामुळेच तर मग बऱ्याच महिलांच्या शरीरात लोहाची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असते, त्यांना ॲनिमियाचा त्रास होतो. म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेली काही फळं नक्कीच खाऊ शकता.3 / 9काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. रात्री झोपण्यापुर्वी काही मनुके पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते बारीक चावून खा.4 / 9मलबेरी, ब्लू बेरी या फळांमध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. त्याशिवाय त्यातून व्हिटॅमिन सी, फायबरदेखील मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही मलबेरी, ब्लूबेरी उपयुक्त ठरते.5 / 9खजूरमधूनही चांगल्या प्रमाणात लोह मिळतं. नुसते खजूर खायला आवडत नसतील तर त्याचे लाडू करा किंवा खजूर शेक करून प्या.6 / 9भरपूर लोह देणारं आणखी एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबात खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.7 / 9अनेक आहारतज्ज्ञ अंजीराला खऱ्या अर्थाने सुपर ड्रायफ्रूट म्हणतात. कारण त्यातून लोह तर मिळतेच पण त्यासोबतच फायबर, कॅल्शियम आणि इतरही अनेक पौष्टिक घटक मिळतात.8 / 9आता उन्हाळा सुरू होत आहे. बाजारात टरबूज भरपूर प्रमाणात येणार. त्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी टरबूज भरपूर प्रमाणात खा. कारण त्यातूनही लोह आणि व्हिटॅमिन सी मिळते. 9 / 9नारळ पाणी हा देखील शरीरातील लोह वाढविण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे.