तुम्हाला प्रचंड स्ट्रेस आहे, कोलमडून पडाल सांगणारी ८ लक्षणं! शरीरातले बदलच सांगतात, आता तरी..
Updated:December 14, 2024 16:03 IST2024-12-14T13:18:48+5:302024-12-14T16:03:40+5:30

कधी कधी आपल्याला जाणवत नाही, पण आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो. लहानसहान गोष्टींचा खूप ताण घेतो आणि मग त्यामुळे आपली पचनशक्ती, चयापचय क्रिया, हार्मोन्सचे संतुलन असे सगळे बिघडून जाते.
त्याचा परिणाम आपोआपच आपल्या तब्येतीवर दिसून येतो आणि शरीरात काही बदल होऊ लागतात. ते बदल नेमके कोणते याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ fitmom.club या सोशल मिडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे.
आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत हे सांगणारं पहिलं लक्षण म्हणजे डोळ्यांखाली सूज येणे. यालाच आपण Bags under eyes किंवा puffy eyes असं सुद्धा म्हणतो.
आपला स्ट्रेस वाढला तर डोळ्यांप्रमाणेच सगळा चेहराच फुगल्यासारखा किंवा सुजल्यासारखा दिसतो.
मनावरचा ताण वाढला की आपोआपच केस गळायला सुरुवात होते. केसांमधून नुसता कंगवा किंवा हात फिरवला तरी केस खूप गळू लागतात.
खूप ताण घेतल्याने फक्त डोक्यावरचेच केस गळत नाहीत तर भुवयांचे केसही पातळ होऊ लागतात असं एक्सपर्ट सांगत आहेत.
आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण घेत असू तर त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर, चयापचय क्रियेवर होतो. त्यामुळे मग कायमच पोट फुगल्यासारखं, गुबारल्यासारखं होतं.
याचाच परिणाम असाही होतो की आपल्या शरीरावर आणि विशेषत: नितंब, मांड्या या भागावर चरबी साठण्याचे प्रमाण वाढते.
कमी वयातच चेहऱ्यावर ॲक्ने, वांग दिसायला लागले असतील तर ते सुद्धा तुम्ही खूप ताणतणावात आहात, हे सांगणारं एक लक्षण आहे.
सतत गरम होणं, खूप जास्त घाम येणं हे देखील तुम्ही मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहात हे सांगणारं एक लक्षण आहे.