हृदय कायम तंदुरुस्त ठेवणारे ८ सुपरफूड! तुम्ही यापैकी काय खाता.. हार्टची काळजी घेता की... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 1:05 PM 1 / 10१. कमी वयातच हृदयविकाराचा झटका येऊन अचानक एक्झिट घेतलेले बरेच लोक आपण आपल्या आजूबाजूला बघतो आहाेत. म्हणूनच तर अगदी आतापासूनच हृदयाची काळजी घेणं आता गरजेचं झालं आहे...2 / 10२. म्हणूनच तर 'दिल की धडकन' नेहमीच तरुण ठेवण्यासाठी नेमकं काय खायला हवं, हे आपण बघूया.. 3 / 10३. ॲव्हाकॅडो हृदयासाठी अतिशय पौष्टिक मानलं जातं. मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई, के, बी ६ आणि सी त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. Penn State University यांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ॲव्हाकॅडो खाल्ल्यास शरीरातील बॅड कोलेस्टरॉलची पातळी नेहमीच कमी राहते. 4 / 10४. पालक- खरंतर सगळ्यात हिरव्या पालेभाज्या हृदयासाठी आवश्यक आहेत. पण त्यातल्या त्यात पालक अधिक पोषक मानला जातो. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, खनिजे, व्हिटॅमिन के असते. काही अभ्यासानुसार हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुमचा हृदयविकाराचा धोका १६ टक्क्यांनी कमी होतो.5 / 10५. ब्रोकोली हा plant-based protein चा खूप चांगला स्त्रोत मानला जातो. हृदयासाठी पोटॅशियम, फोलेट गरजेचं आहे. १ कप उकडलेल्या ब्रोकोलीतून जवळपास ५५० मिलीग्रॅम पोटॅशियम आणि १४ टक्के फोलेट मिळतं. 6 / 10६. ऑलिव्ह ऑईलमधून आपल्याला भरपूर प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळते. रोज अर्धा टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल हृदयविकाराचा धोका १५ टक्क्यांनी कमी करते, असे काही अभ्यासातून सांगण्यात आले आहे. 7 / 10७. हृदयविकाराचा धोका कमी करायचा, तर नियमितपणे ३ ते ४ अक्रोड खावेत. फायबर आणि मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज असे हृदयासाठी पोषक असणारे मायक्रोन्युट्रीयंट्स त्यात भरपूर प्रमाणात असतात. 8 / 10८. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी असे बेरी प्रकारातली फळं ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. हा स्ट्रेस कमी झाला की आपोआपच हृदयविकाराचा धोका कमी होतो. 9 / 10९. चॉकलेटप्रेमी असाल तर डार्क चॉकलेट बिंधास्त खा. कारण यामध्ये हृदयासाठी पोषक ठरणारे flavonoids मोठ्या प्रमाणावर असतात10 / 10१०. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. तसेच ते ऑक्सिडेटीव्ह डॅमेज कमी करण्यासाठी मदत करतात. कच्चे टोमॅटो नियमित खाल्ल्यानेही शरीरातील चांगल्या कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढत जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications