8 warning signs that shows you are eating too much sugar
तुम्ही जास्त प्रमाणात साखर खाता हे सांगणारी ८ लक्षणं, घरच्याघरी करा स्वत:चीच सोपी टेस्टPublished:September 15, 2024 09:12 AM2024-09-15T09:12:16+5:302024-09-16T14:35:14+5:30Join usJoin usNext साखरेचा अतिरेक टाळणं ही आता सगळ्याच वयोगटातील व्यक्तींसाठी अतिशय गरजेची बाब आहे. तुमच्या आहारात साखर जास्त प्रमाणात होत असेल तर तुमचे शरीर त्याबाबत सूचना द्यायला सुरुवात करतं. (warning signs given by your body that shows you are eating too much sugar ) पण आपण त्या सूचना ओळखू शकत नाहीत. आपल्या आहारात साखर जास्त प्रमाणात होत आहे, हे सांगणारी लक्षणं कशी कोणती याविषयी आहारतज्ज्ञ नेहा सहाया यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. तुमच्या शरीरातही ती लक्षणं आढळून येतात का ते तपासून पाहा.. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या एनर्जी लेव्हलमध्ये सातत्याने बदल होणं. कधी एकदम उत्साही वाटणं तर कधी अगदीच डल वाटणं.. चेहऱ्यावर सूज आल्यासारखी वाटत असेल, डोळ्यांखालचा भाग सुजलेला वाटत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात साखर खात आहात. खूप जास्त मूड स्विंग होणे हे देखील साखरेचा अतिरेक होत असल्याचं एक लक्षण असू शकतं. जास्त साखर खाल्ल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. रात्री शांत झोप न येणे, झोप लागली तरी लगेच जाग येणे. सातत्याने अपुरी झोप होणे. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणं, ॲक्ने असे त्रासही आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर होऊ शकतात. वजन भराभर वाढत असेल तर एकदा आहारातील साखरेचे प्रमाण तपासून पाहा.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips