Join us   

टुणुक टुणुक भोपळ्याचे ९ फायदे- आजीबाईसारखी आपल्यालाही मिळेल सुपरपॉवर! आजारांनी बेजार होणंच संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 5:25 PM

1 / 10
उत्तम आरोग्यासाठी भाजी खाणं फायदेशीर ठरतं (Pumpkin). विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये भोपळा (Bhopala) आवडीने खाल्ला जातो. भोपळा हा जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारख्या महत्वाच्या पोषक तत्वांचा साठा आहे (Health Benefits). भोपळा हा पोटॅशियम, तांबे आणि मँगनीज सारख्या खनिजांचा उत्कृष्ट स्रोत (Fitness) आहे(9 Impressive Health Benefits of Pumpkin).
2 / 10
भोपळ्यामध्ये (Bhopala) अँटिऑक्सिडंट असते. यासह त्यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. यासह मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासूनही बचावते. मुख्य म्हणजे हृदयरोग आणि कर्करोगापासून सरंक्षण करते.
3 / 10
भोपळ्यातील व्हिटॅमिन ए पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन आणि कार्यास मदत करते.
4 / 10
भोपळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त त्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. ऋतू बदलांमुळे होणारे आजार दूर होतात.
5 / 10
भोपळ्यातील बीटा-कॅरोटीनचे उच्च प्रमाण शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. जे डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन ए कॉर्नियाचे संरक्षण करण्यास मदत करते. ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
6 / 10
भोपळ्यातील फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून, रक्ताभिसरणाला चालना देते. पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियमची पातळी कमी करते. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.
7 / 10
भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. मुख्य आतडे संबंधित त्रास कमी होतो.
8 / 10
भोपळा हे बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. जे कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्वचेला पोषण देते. यासह त्यातील व्हिटॅमिन ई त्वचा हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा मुलायम होते.
9 / 10
भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्याचा फायदा मधुमेहग्रस्त रुग्णांना होतो.
10 / 10
भोपळ्याच्या बिया, विशेषतः, प्रथिने आणि मॅग्नेशियमचा एक उत्तम स्रोत आहेत, दोन्ही स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी मदत मिळते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यडोळ्यांची निगात्वचेची काळजीमधुमेहवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स