उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्याचा गारेगार पर्याय, मेहेंदीचे डिझाइन राहू द्या ही पाहा अशी वापरा
Updated:March 12, 2025 08:35 IST2025-03-12T08:32:52+5:302025-03-12T08:35:01+5:30
A Great Option To Reduce Body Heat In Summer, Just Use Mehendi : शरीरातील उष्णता कमी करायचा सोपा उपाय. पाहा मेहेंदीचे फायदे.

भारतामध्ये मेहेंदी हाताला लावण्याची परंपरा फार जुन्या काळापासून चालत आली आहे. लग्न समारंभात तसेच विविध सणांनाही मेहेंदी काढली जाते.
मेहेंदीचे झाड असते. त्याच्या पानांपासून ही मेहेंदी तयार केली जाते. मेहेंदी फक्त हात सुंदर दिसावेत म्हणून वापरली जात नाही.
मेहेंदीमध्ये अनेक गुणधर्मही असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असातात. त्यामुळे मेहेंदी लावणे चांगले मानले जाते.
केसांना रंगवण्यासाठी, पांढऱ्या केसांना काळेभोर करण्यासाठी मेहेंदी वापरली जाते. मेहेंदी ही रंगाचा नैसर्गिक स्त्रोत आहे.
मेहेंदी फार थंड असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी मेहेंदी लावणे फार चांगले. सर्दी खोकला असेल तर मेहेंदी लाऊ नये.
मेहेंदीमुळे डोकेदुखीही कमी होते. डोक्याला थंडावा मिळतो. मात्र नैसर्गिक मेहेंदळीच वापरावी.
पायांना मेहेंदी लावली जाते. डिझाइन नाही तर साधा मेहेंदीचा लेप. त्यामुळे शरीरातील उष्णता खेचली जाते. पित्ताचा त्रासही कमी होतो.
मेहेंदीची पाने जखम बरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वापरली जातात. त्यांचा लेप लावल्याने जखमांचे डाग नाहीसे होतात.
पित्त दोषाचे बरेचसे आजार मेहेंदीमुळे दूर करता येतात.
या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही मेहेंदीचे हे फायदे लक्षात ठेवा आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मेहेंदीचा वापर करा.