डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

Published:June 20, 2024 05:33 PM2024-06-20T17:33:33+5:302024-06-20T22:06:24+5:30

Right Way To Cook Pulses To Get Maximum Benefits : आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार डाळी बनवताना प्रेशर कुकरमध्ये जितकं पाणी घालाल जितकीच ती डाळ जास्त उकळेल आणि त्यातील पोषक तत्व व्यवस्थित टिकून राहतील.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

डाळी भारतीय जेवणातील प्रोटीन्सचा एका महत्वपूर्ण सोर्स आहे. वजन वाढण्याच्या भितीने अनेकजण भात खात नसले तरीही वरण खातात. संपूर्ण देशभरात डाळ बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. काही लोक वरण बनवतात डाळ भिजवून ठेवतात तर काहीजण पातळ डाळ खाणं पसंत करतात.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

वरण बनवण्याच्या काही बेसिक चुकांमुळे त्याचं प्रोटीन कमी होतं. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईन्सनुसार डाळ बनवण्याच्या पद्धतीमुळे त्यातील पोषक तत्व त्यात टिकून राहतात आणि डाळ खाण्याचा पुरेपूर फायदा होतो. आयसीएमआरने डाळ बनवण्यची योग्य पद्धत सांगितली आहे.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

आयसीएमआरनुसार डाळीची गुणवत्ता खराब होऊ नये यासाठी बॉयलिंग किंवा प्रेशर कुकर हे दोन्ही चांगले उपाय आहे. यामुळे डाळीतील फायटीक एसिड कमी होण्यास मदत होते. डाळीतील फायटीक एसिड शरीराल कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक, आयर्न यासारखी महत्वपूर्ण मिनरल्स शोषण्यात मदत करतात.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

ICMR नुसार डाळींना खूप जास्तवेळ उकळू नये. डाळी खूप जास्तवेळा उकळल्याने त्याची टेस्ट जाते. याशिवाय त्यातील पोषक तत्वही कमी होतात. जास्त उकळल्यामुळे डाळीतील प्रोटीन क्वालिटी खराब होते.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार डाळी बनवताना प्रेशर कुकरमध्ये जितकं पाणी घालाल जितकीच ती डाळ जास्त उकळेल आणि त्यातील पोषक तत्व व्यवस्थित टिकून राहतील.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

जर तुम्ही कुकरमध्ये डाळ बनवत असाल तर एक कप डाळीत २ ते ३ कप पाणी घाला आणि तुम्ही पातेल्यात डाळ बनवत असाल तर एक कप डाळीत चार कप पाणी घालणं योग्य ठरेल.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

मुगाची किंवा तुरीची डाळ खाणं आरोग्यासाठी सर्वात जास्त चांगले ठरते. मुगाची डाळ पचायलाही हलकी असते.

डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा

(Image Credit - Social Media)