पोट साफ होत नाही, गॅसेसचा त्रास वाढलाय? रोज ५ पदार्थ खा; पचन सुधारेल पटकन By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:08 PM 1 / 7आजकाल लोक घरी बनवलेले पदार्थ कमी आणि बाहेरचं फास्ट फूड जास्त खातात. यामुळे पचनक्रिया बिघडते. अन्हेल्दी चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे कॉन्स्टिपेशन, गॅसचा त्रास वाढतो. जे लोक नेहमीच तेलकट, तिखट पदार्थ खातात त्यांना गॅसचा त्रास सगळ्यात जास्त जाणवतो. जास्त दारू पिणं, धुम्रपान उपाशी राहणँ यामुळेही गॅसची समस्या वाढत जाते. (According to several study these 6 foods give relief from constipation and piles)2 / 7जास्त दिवस गॅसचा तसाच राहिला तर मुळव्याध होण्याचा धोका वाढतो. डेली डाएट आणि खाण्यापिण्यातील चुका सुधारल्यास पोटातील सूज गॅस्ट्रिक त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते. NHS च्या अहवालानुसार, बद्धकोष्ठता टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जीवनशैलीत बदल आणि योग्य प्रकारचे फायबर युक्त आहार घेणे. यासोबतच रोज योगा आणि व्यायाम करा. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत ते जाणून घेऊया.3 / 7पपई पोटाच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरते. याच्या सेवनानं पोटासंबंधी समस्या दूर राहतात. पपईत फायबर्सचे प्रमाण खूप असते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. यात प्रोटिन्स, पोटॅशियम, फायबर्स, व्हिटामीनसह अनेक पोषक तत्व असतात.4 / 7 नाश्त्यात ओट्सचा समावेश केल्यास पचनक्रिया चांगली राहते. ओट्समध्ये आयर्न, प्रोटिन्स, फॉलेट, कॉपर, कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे लिव्हरचं आरोग्यही चांगले राहते. फायबर रिच फूडमुळे पनक्रिया चांगली राहून कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून आराम मिळतो. 5 / 7हिरव्या भाज्या खाल्ल्यानं तब्येत चांगली राहेत. कडधान्य, ब्रोकोली, पालक या भाज्यांचा आहारात समावेश करा. यात भरपूर पोषक तत्व असतात. ncbi च्या रिपोर्टनुमसार कच्ची ब्रोकोली आणि अल्फा स्प्राऊट्स खाल्ल्यानं गॅसचा त्रास दूर होतो. 6 / 7फायबरयुक्त पदार्थांव्यतिरिक्त, फ्लेक्ससीड्स देखील पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यात प्युरिफाईंग गुणधर्म आहेत. त्याच्या वापरामुळे मल पास करणे सोपे होते. तुम्ही पराठ्यातही या बीया खाऊ शकता. 7 / 7डाळी आपल्याला ऊर्जा देण्यासोबतच आपली पचनसंस्था सुधारण्याचे काम करतात. बहुतेक बीन्स, मसूर, चणे आणि मटारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. लंच किंवा डिनर डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. यामध्ये अनेक प्रकारचे आहारातील घटक आढळतात, जे संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications