हिमोग्लोबिन कमी आहे, थकवा खूप येतो? आचार्य बाळकृष्ण सांगतात, १ पदार्थ नियमित खा-रक्त वाढेल By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:27 PM 1 / 7शरीरात रक्त कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणववतो, अंगात त्राण राहत नाही अशी तक्रार अनेकांची असते. रक्त वाढवण्यासाठी आहारात बदल करणं ही प्रमुख पायरी आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रक्ताची कमतरता भरून काढू शकता. आचार्य बाळकृष्ण यांनी रक्त वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत याबाबत सांगितले आहे. 2 / 7आयुर्वेदात अनेक जडीबुटींबद्दल सांगण्यात आले आहे. ज्यात एक गुळवेल आहे. गुळवेलाचे सेवन केल्यानं शरीराली बरेच फायदे मिळतात. गुळवेलात अनेक रासायनिक संयुगे असतात, ज्यात औषधी गुणधर्म आहेत. 3 / 7यामध्ये अल्कलॉइड्स, ग्लुकोसाइड्स, टॅनिन आणि इतर संयुगे समाविष्ट आहेत. यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुळवेल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हे वेगवेगळ्या संक्रमणांशी लढण्यास देखील मदत करते.4 / 7गुळवेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सूज कमी करण्यास मदत करतात. संधिवात, सांधेदुखी आणि इतर दाहक समस्यांपासून आराम देण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. 5 / 7यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. 6 / 7हे अकाली वृद्धत्व टाळण्यास देखील मदत करू शकते. गिलॉय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते, जे टाइप -2 मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.7 / 7गुळवेल यकृताची कार्य क्षमता वाढवण्यास मदत करते आणि विषारी पदार्थांपासून संरक्षण करते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications