दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

Updated:January 16, 2025 14:01 IST2025-01-16T12:30:45+5:302025-01-16T14:01:27+5:30

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

दिवसभराची कामं झाल्यानंतर दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर अनेकांना खूप झोप यायला लागते. सकाळपासून जी धावपळ सुरू असते त्यामुळे दुपारच्यावेळी थोडा थकवा येणं साहजिक आहे.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

कामामुळे प्रत्येकालाच दुपारची झोप घेणं शक्य होत नाही. पण ज्या महिला घरीच असतात, ज्यांना दुपारी थोडी झोप घेणं सहजशक्य असतं त्या महिलाही दुपारी झोपणं टाळतात.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मनात अशी भीती असते की दुपारी झोपल्यामुळे वजन वाढतं. आता यामध्ये कितपत तथ्य आहे आणि दुपारी झोपल्यामुळे खरंच वजन वाढतं का, दुपारच्या झोपेचा आणि वजनाचा नेमका काय संबंध आहे याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

यामध्ये एक्सपर्ट असं सांगत आहेत की दुपारी जर खूपच थकवा आला असेल तर १५ ते २० मिनिटांची पॉवर नॅप घ्यायला काहीच हरकत नाही. उलट अशी झोप तुम्हाला फ्रेश करणारी असते.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

पण काही लोक दुपारी अगदी २- २ तास झोपतात. एवढी झोप जर दुपारी घेतली तर ते मात्र वजन वाढीसाठी आमंत्रण देणारं ठरू शकतं.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

कारण दुपारी जास्त झोप झाली की रात्री झोप येत नाही. रात्रीच्या झोपेचे चक्र बिघडले की शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे मग त्याचा परिणाम वजन वाढीवर दिसून येतो.

दुपारी झोपलं तर वजन खरंच वाढतं? तज्ज्ञ सांगतात, दुपारची डूलकी नी वजनाचं कनेक्शन

त्यामुळे अशा पद्धतीने रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल, एवढे दुपारी झोपू नये. अवघ्या काही मिनिटांची पॉवर नॅप मात्र शक्य असेल तर नक्कीच घ्यावी, असं एक्सपर्ट सांगतात.