बाळंतपणानंतर महिनाभरातच आलिया भटने सुरू केला योगाभ्यास, सुरु केला वेटलॉस प्रवास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 5:42 PM 1 / 8 १. बाळंतपण झालं की त्या बाळंतिनीला चांगलं दोन- तीन महिने आराम करण्याचा सल्ला आपल्याकडे दिला जातो. त्यामुळे मग तब्येतही चांगलीच सुधारते आणि वजनही वाढतं. पण अभिनेत्री आलिया भट मात्र बाळंतपण झाल्यानंतर महिना भरातच जीममध्ये दिसून आली.2 / 8२. आलियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानी यांच्याकडे योगाला जाताना दिसली. बाळाला घरी घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांना तिची झलक पाहायला मिळाली.3 / 8३. बाळंतपणानंतर वजन वाढल्याचा अनुभव जवळपास प्रत्येक स्त्री ला येतो. अभिनेत्रीही त्याला अपवाद नाहीत. पण आलियाच्या तब्येतीत मात्र खूप काही फरक पडलेला नाही. तिचे वजनही खूप वाढलेले जाणवत नाही.4 / 8४. प्रेग्नन्सी आणि बाळ झाल्यानंतरचे दोन- तीन महिने या काळात सर्वसामान्य महिलांची तब्येत खूप जास्त सुधारते. वजनही खूप वाढतं. ते पुन्हा पुर्वपदावर आणताना अनेकींची दमछाक होते. पण बॉलीवूड अभिनेत्रींना मात्र हे सगळं कसं जमतं, असा अनेकींचा प्रश्न असतो. म्हणूनच पाहा आलियासह इतर अभिनेत्रींनीही बाळंतपणानंतर वजन कसं कमी केलं...5 / 8५. तैमूर आणि जेह या दोघांच्याही जन्मानंतर करिना कपूरचं वजनही १२ ते १५ किलोंनी वाढलं होतं. योगा आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर भर देऊन तिने ४ ते ५ महिन्यात हे वजन घटवलं.6 / 8६. स्लिम ॲण्ड ट्रिम अभिनेत्री शिल्पा शेट्टीही याला अपवाद नव्हती. मोठ्या मुलाच्या जन्मानंतर शिल्पाचं वजनही वाढलं होतं. पण ३ महिन्यांत तिने तब्बल २१ किलो वजन कमी केलं. योगा, इतर व्यायाम आणि स्ट्रिक्ट डाएट असा तिचा वेटलॉस प्लॅन होता.7 / 8७. अनुष्का शर्माने वामिकाच्या जन्मानंतर बोलताना एकदा सांगितले होते की ब्रेस्ट फिडिंगमुळे तुम्ही तुमच्या डाएटमधून कॅलरीज एकदम काढून टाकू शकत नाही. त्यामुळे अनुष्काने वेटलॉससाठी हेल्दी डाएट आणि व्यायाम असा फॉर्म्युला स्विकारला होता.8 / 8८. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या रायने रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी आणि त्यात लिंबाचा रस, फॅट फ्री डाएट, बॉडी हायड्रेटेड ठेवणे आणि रोज ४५ मिनिटांचा योगा असं सगळं करून वजन घटवलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications