Join us

नातीपासून आजीपर्यंत प्रत्येकीने रोज खावा 'हा' पदार्थ - हार्मोन्सचा त्रास कधीच होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 14:32 IST

1 / 7
सध्या Hormonal Imbalance चा म्हणजेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याचा त्रास अनेकींना होतो आहे. बदललेली जीवनशैली, आहारात झालेला बदल अशा काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत.(amazing superfood to get rid of hormonal imbalance in women)
2 / 7
शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले की मग त्यातूनच पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व, थायरॉईड, वजन वाढणे असे अनेक त्रास होतात. हे त्रास टाळायचे असतील तर एक स्वस्तात मस्त पदार्थ प्रत्येक वयोगटातल्या महिलांनी अगदी नियमितपणे खायला हवा, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
3 / 7
तो पदार्थ नेमका कोणता याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nehaskitchen97 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगत आहेत की संध्याकाळच्या वेळी जेव्हा थोडीशी भूक लागते तेव्हा हा पदार्थ तोंडात टाका.
4 / 7
हा पदार्थ करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ चमचा तूप घाला.
5 / 7
तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये १ चमचा गूळ घाला. गूळ तुपामध्ये पुर्णपणे विरघळून द्या.
6 / 7
गूळ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये मुठभर फुटाणे घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवा. फुटाण्यांना गूळ व्यवस्थित लागला की मग गॅस बंद करा.
7 / 7
असे गूळ फुटाणे दररोज नियमितपणे खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतील असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलापीसीओडीपीसीओएस आणि पीसीओडीहोम रेमेडी