1 / 9लग्न समारंभांमध्ये मेहेंदीला फार महत्व असते. प्रत्येकीच्या हाताला मेहेंदी लावलेली असते. दिसायला फार सुंदर दिसते. वेगवेगळ्या डिझाइन्स फार छान वाटतात. 2 / 9मेहेंदी दिसते तर सुंदरच पण तेवढीच औषधी असते. मेहेंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. फक्त दिसायला छान असते किंवा ब्यूटी प्रॉडक्ट म्हणून मेहेंदी वापरत असाल तर आता या पद्धतीनेही मेहेंदी वापरायला सुरवात करा. 3 / 9मेहेंदी आपण केसांनाही लावतो. पांढरे केस गायब करुन त्यांना छान लाल, सोनेरी, काळा रंग मेहेंदी लावल्याने येतो. मेहेंदी लावल्याने फक्त केस काळे होत नाहीत तर डोकं ही छान शांत होतं आणि गार वाटतं.4 / 9मेहेंदीमध्ये अँण्टीसेप्टिक गुणधर्म असतात. तसेच मेहेंदीमध्ये अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्मही असतात. त्यामुळे मेहेंदी लावणे फायद्याचेच ठरते.5 / 9मेहेंदी लावल्याने डोकेदुखी थांबते. सतत जर डोके दुखत असेल तर अधूनमधून मेहेंदी लावत जा. डोके दुखायचे तर थांबतेच. पण शांत झोपही लागते.6 / 9मेहेंदी प्रचंड थंड असते. म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये रात्री मेहेंदी लाऊ नका असे म्हणायची पद्धत आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मेहेंदी लावणे फार फायद्याचे ठरते. केसांना सतत मेहेंदी तर लाऊ शकत नाही. मग हा उपाय करुन बघा. 7 / 9तळव्यांना मेहेंदी चोळायची पद्धत भारतामध्ये वर्षानुवर्षे चालत आली आहे. तळव्यांना ओली मेहेंदी लावायची आणि मग शांत झोपायचे. असे केल्याने अनेक फायदे मिळतात.8 / 9पित्ताचा त्रास कमी होतो. शरीरातील वाढलेली उष्णता कमी होते. जर उष्णतेमुळे काही आजार उद्भवले असतील तर ते ही बरे होतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मेहेंदी जादूसारखे काम करते. 9 / 9पायांच्या भेगाही भरतात. कारण अनेकदा उष्णतेच्या त्रासमुळेच या भेगा वाढत जातात. मेहेंदी सातत्याने लावली की मग त्या भेगाही भरुन निघतात.