Join us   

रात्रीच्या जेवणानंतर ५ गोष्टी करणं टाळा; अन्यथा पोट सुटेल, गॅसेस-ब्लॉटींगचा त्रासही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 5:50 PM

1 / 6
वजन कमी करण्याासाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. व्यायाम डाएटचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करतात हे उपाय करूनही त्याचं वजन १ किलोनेही कमी होत नाही. यामागे रोजच्या काही चुकीच्या सवयी असू शकतात. (5 Things You Shouldn't Do After a Full Meal)
2 / 6
रात्रीच्या जेवणानंतर काही चुका केल्यामुळे वजन कमी होत नाही. रोजच्या रुटीनमधील अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे वजन कमी होत नाही याबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे.
3 / 6
जेवण झाल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते असं करणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीर अन्न व्यवस्थित डायजेसस्ट करू शकत नाही. यामुळे बॉडी फॅट जमा होतं. चहा किंवा कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिज्म स्लो होते हे वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे.
4 / 6
लोकांना जेवल्यानंतर काहीही गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी ते क्रेव्हिंग्स रोखू शकत नाही. असं केल्यानं वजन वेगानं वाढतं. कारण यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. गोड खाल्ल्यानं डायजेस्टीव्ह आग विझते आणि खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही.
5 / 6
रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने वजन कमी होण्यात अडथळे येऊ शकतात. यामुळे मेटाबॉलिझ्मवर परिणाम होतो पचनक्रियेवर परिणाम होतो. जेवल्यानंतर थेट झोपण्यापेक्षा अर्धा तास आधी चालायला जा.
6 / 6
जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे मेटाबॉलिझ्म स्लो होतो आणि पचनक्रिया संथ होते. ज्यामुळे वजन वेगानं वाढतं. जेवल्यानंतर अर्धा ते एक तासाने पाणी प्या.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स