ऋतू बदलताना चुकूनही खाऊ नका कफ वाढवणारे ‘हे’ ५ पदार्थ, घसा बसेलही-दुखेलही..
Updated:February 21, 2025 13:42 IST2025-02-20T20:03:26+5:302025-02-21T13:42:42+5:30
Avoid eating these 5 food items for a healthy throat : कफ वाढवणारे हे पदार्थ खाणे कमी करा. घसा चांगला ठेवा.

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते.
कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत.
ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो, त्यांनी असे पदार्थ टाळणेच योग्य.
असे पाच पदार्थ आहेत ज्यांचे आपण सतत सेवन करतो. आणि त्यामुळे कफ वाढतो. जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत.
१. दही शरीरासाठी चांगले असले तरी ते थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला , कफ होतो अशा लोकांनी दही खाणे टाळा.
२. अनेकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. पण तिखट पदार्थांमुळे घशाला त्रास होतो. त्यामुळे कफ, खोकला होतो. तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.
३. गार पेये प्यायला सगळ्यांनाच आवडतात. पण गार पेये घशासाठी चांगली नाहीत. त्यांच्यामुळे कफच नाही तर सर्दी, खोकलाही वाढतो.
४. तळलेल्या पदार्थांमुळे हमखास कफ वाढतो. असे पदार्थ स्वास्थ्यासाठीही चांगले नाहीत. पदार्थ तळण्यापेक्षा कमी तेलात शॅलो फ्राय करा.
५. कोणत्याही प्रक्रियेतून गेलेले अन्न म्हणजेच पॅकेट फूड घशासाठी चांगले नाही. त्यात भरपूर रसायनयुक्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. असे पदार्थ खाणे टाळा.