Join us

छातीत जळजळ-ॲसिडिटी-करपट ढेकर येते? १० पदार्थ चुकूनही खाऊ नका, तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 15:17 IST

1 / 11
कामाची बदलेली वेळ, जंक फूड, अधिक ताण, झोप पूर्ण होणे आणि वेळेवर न जेवणे यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो. हा त्रास इतका वाढतो की, अशावेळी नेमके काय करावे समजत नाही. (Foods to avoid for acidity and gas)
2 / 11
ॲसिडिटीमुळे आपल्या पाणी प्यायल्यानंतर देखील छातीत जळजळ होते ज्यामुळे अस्वस्थता वाढते. (Foods that worsen heartburn symptoms) जर आपल्यालाही वारंवार ॲसिडिटीची समस्या होत असेल तर आहाराकडे लक्ष द्यायला हवा. आहारात काही पदार्थ कमी प्रमाणात खायला हवे. कोणते पदार्थ अशावेळी खावू नये जाणून घेऊया डॉक्टरांकडून (Worst foods for heartburn relief)
3 / 11
आपल्या प्रत्येकाच्या घरात लिंबू हा असतोच. अनेकदा ॲसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी आपण लिंबू पाणी पितो. परंतु, यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या अधिक वाढते.
4 / 11
ॲसिडिटीची समस्या झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे पोटातील ऍसिड वाढून करपट ढेकर येण्यास सुरुवात होते.
5 / 11
ॲसिडिटी झाल्यानंतर चुकूनही तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. यामुळे पचन मंदावते, पोटदुखीची समस्या वाढते.
6 / 11
हा त्रास उद्भवल्यानंतर अनेकजण आल्याचा चहा किंवा कॉफी पितात. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते जे ऍसिड रिफलेक्ट करण्याचे काम करते.
7 / 11
ॲसिडिटी झाल्यावर काही लोक गोडाचे पदार्थ अधिक प्रमाणात खातात. यामध्ये कॅफिन आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ॲसिडिटी कमी होण्याऐवजी ती अधिक प्रमाणात वाढते.
8 / 11
करपट ढेकर येऊ लागली आपण सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पितो. यामुळे पोटात गॅस तयार होतो अशावेळी ॲसिडिटी कमी होत नाही तर त्रास वाढतो.
9 / 11
पनीर, दूध, दही हे पचन मंद करतात. छातीत जळजळ होत असेल तर हे पदार्थ खाऊ नका. यामुळे अस्वस्थता वाढते.
10 / 11
अनेकांना जेवताना कच्चा कांदा खाण्याची सवय असते. कोशिंबीर किंवा मासांहरी पदार्थांसोबत सहज कांदा खातात. यामुळे पित्ताचा त्रास वाढतो.
11 / 11
ताटात चवीपुरता वाढलेल लोणचं आपण अधिक खाल्ल की त्रास होतो. यामध्ये तेलाचे,मिठाचे आणि मसाल्याचे प्रमाण जास्त असते. ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर लोणचं खाऊ नका.
टॅग्स : आरोग्यआहार योजनाहेल्थ टिप्स