म्हातारपणी पार्किंसन, अल्झायमरचा त्रास नको तर ३ सवयी आताच लावून घ्या- मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी...
Updated:September 13, 2024 17:14 IST2024-09-13T17:08:26+5:302024-09-13T17:14:45+5:30

म्हातारपणी पार्किंसन, विस्मरण किंवा मेंदूशी संबंधित विकार होऊ द्यायचे नसतील तर आतापासूनच या तीन सवयी स्वतःला लावून घ्या.(avoid these 3 things for brain health)
त्या ३ सवयी नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती मेंदू रोग तज्ञांनी docpriyankasehrawat या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
हल्ली मेंदूशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप जास्त वाढत चालले आहे. त्यामुळेच अगदी कमी वयापासूनच या ३ सवयी स्वतःला लावून घ्या.
सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या मेंदूला पुरेसा आराम मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे रात्रीची झोप ७ ते ८ तासांची झालीच पाहिजे. सतत अपुरी झोप घेत असाल तर मेंदूचा थकवा जात नाही आणि असे आजार होण्याचा धोका वाढतो.
झोपण्याच्या २ तास आधी मोबाईल किंवा इतर कोणतीही स्क्रिन पाहणं पूर्णपणे बंद करा. स्क्रिन पाहून जर तुम्ही झोपत असाल तर त्याचा झोपेवर परिणाम होतो. झोप शांत लागत नाही. त्यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे नाश्ता न करता कधीही घराबाहेर पडू नका. यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. डोकेदुखी होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे नेहमी पोटभर नाश्ता करूनच घराबाहेर पडा.
तिसरी गोष्ट म्हणजे दररोज ३० मिनिटांसाठी ब्रिस्क वॉकिंग करा. तुम्ही घरातल्या घरात कामांसाठी भरपूर चालत असाल पण ते तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त नाही.