Join us   

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 7:20 PM

1 / 7
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक आजारांचा प्रसार होतो. मलेरिया, डेग्यू, चेस्ट इन्फेक्शन असे आजार वाढतात. पावसाळ्यात व्हायरल फिव्हरसुद्धा पसरतो. आजार कोणताही असो पहिलं लक्षण म्हणजे ताप.
2 / 7
आजारी पडल्यानंतर ताप, अंगदुखी ही लक्षणं दिसून येतात. ताप आल्यानंतर आंघोळ करायची की नाही असा प्रश्न पडतो.
3 / 7
हेल्थ एक्पर्ट्सच्या मते फिव्हर म्हणजेच ताप आल्यानंतर अंघोळ केल्यानं शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही पण ताप असताना अंगदुखी, विकनेस येतो त्यामुळे बऱ्याचजणांची अंघोळ करण्याची जराही इच्छा होत नाही.
4 / 7
तुम्ही ताप असताना अंघोळ करू शकता फक्त थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरा. कारण कोमट पाण्यानं अंघोळ केल्यानं मांसपेशींना आराम मिळतो. शरीराचं वाढलेलं तापमानही कमी होतं.
5 / 7
रोज अंघोळ करण्याची सवय असते त्यांना ताप असेल तरीही अंघोळ करण्याची इच्छा होते. अशावेळी एक स्वच्छ टॉवेल गरम पाण्यात बुडवा आणि या पाण्यानं अंग पुसा.
6 / 7
यामुळे ताप कमी होईल आणि मांसपेशींनाही आराम मिळेल. थंड पाण्यात टॉवेल बुडवू नका अन्यथा जास्त थंडी वाजून ताप वाढेल.
7 / 7
गोळ्यांमुळे बराच घाम आलेला असतो अशावेळी अंघोळ न करता राहिल्यानं अंग जास्त चिकट वाटतं. म्हणूनच कोमट पाण्यानं अंघोळ करणं हा उत्तम पर्याय आहे.
टॅग्स : हेल्थ टिप्स