रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

Updated:April 10, 2025 12:40 IST2025-04-10T12:33:12+5:302025-04-10T12:40:51+5:30

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

आपल्या स्वयंपाक घरात अनेक पदार्थ असतात. पण त्यांचे महत्त्व आपल्याला माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजारी पडल्यावर विकतचे औषधी खात बसतो..

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

असंच काहीसं लवंगचं सुद्धा आहे. लवंगची आठवण आपल्याला तेव्हाच येते जेव्हा सर्दी, खोकला असा त्रास होतो. पण आहारतज्ज्ञ असं सांगतात की लवंग अशी कधीतरीच खाण्यापेक्षा दररोज नियमितपणे चावून खा. कारण त्यामुळे आरोग्याला खूप जास्त फायदे होतात. ते फायदे नेमके कोणते ते पाहूया..

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutritionistdeepaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की लवंग ही नॅचरल पेन किलर म्हणून काम करते. त्यामुळे मासिक पाळीतला त्रास, डोकेदुखी, दाढदुखी असे अनेक त्रास कमी करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर ठरते.

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

लवंगमध्ये असणाऱ्या ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल घटकांमुळे शरीराच्या एखाद्या भागात आलेली सूज कमी होण्यासही मदत होते.

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

लवंग पचनासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन, ॲसिडीटी असा त्रास असतो त्यांनी दररोज १ लवंग नियमितपणे चावून खावी.

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास लवंग उपयुक्त ठरते. त्यामुळे जर दररोज एक लवंग नियमितपणे खाल्ली तर वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणही बरंच कमी होतं.

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

मुखदुर्गंधी कमी होण्यासाठीही लवंग खाणे फायदेशीर ठरते.