Join us   

रात्री पाण्यात भिजवा, सकाळी खा ‘या’ ६ प्रकारच्या बिया- गळणारे केस-वाढलेलं वजन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 3:44 PM

1 / 9
उत्तम आरोग्यासाठी पौष्टीक आहार घेणं गरजेचं. पौष्टीक आहार खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे होतात. पौष्टीक आहारात कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि ओमेगा असणं गरजेचं आहे. याचा फायदे मेंदू, हाडं, हृदय एकंदरीत सगळ्या अवयवांना होतो(Benefits of Soaking, nuts, seeds, beans & grains).
2 / 9
फळ, भाज्यांसोबत बियांचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे. यासाठी आपण आपल्या आहारात भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, मेथी दाण्यांचा समावेश करू शकता. रोज पाण्यात भिजवलेल्या बिया खाल्ल्याने अधिक फायदे मिळू शकते.
3 / 9
पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, 'बिया भिजवल्याने त्यातील एन्झाइम सक्रिय होतात आणि फायटिक ऍसिडसारखे घटक कमी होतात. शिवाय भिजलेल्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, आणि शरीर पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यास सक्षम होते.'
4 / 9
सूर्यफुलाच्या बिया २-४ तास पाण्यात भिजवून खाल्ल्याने एन्झाइम सक्रिय होतात. जे पोषक शोषण वाढवतात आणि पचन सुधारतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि बी, मॅग्नेशियम आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात.
5 / 9
आपण पांढरे किंवा काळे तिळाचा देखील आहारात समावेश करू शकता. ४ - ५ तास काळे तीळ पाण्यात भिजत ठेवल्याने त्यातील कॅल्शियम आणि लोहाचे शोषण वाढते. ज्याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो.
6 / 9
भोपळ्याच्या बिया पाण्यात ६ - ८ पाण्यात भिजत ठेवल्याने त्यातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. जे हृदय, झोप, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. भोपळ्याच्या बिया पचायलाही सोपे असतात.
7 / 9
बदमामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फॉस्फरस, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपरफूड मानले जाते. बदामाचे पोषण शरीराला मिळावे यासाठी पाण्यात भिजत घालून खावे.
8 / 9
चिया सीड्स वेट लॉससाठी बेस्ट मानले जाते. चिया सीड्स पाणी शोषून घेतात. यातील ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबरमुळे आरोग्य सुधारते.
9 / 9
मेथी दाण्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. याचा फायदा फक्त आरोग्य नसून, केस आणि त्वचेलाही होतो. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, निर्जीव केस आणि इतर समस्येचा त्रास होत नाही.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य