कापूर- तूप एकत्र करा आणि बघा जादू, पिंपल्सपासून ते डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 5:00 PM 1 / 9तूप हे किती आरोग्यदायी आहे हे तर आपण सगळेच जाणतो. त्यामुळे आपल्या आहारात तूप असणं अतिशय गरजेचं आहे. पण सौंदर्य वाढविण्यापासून ते अनेक आजारांना पळवून लावण्यापर्यंत तूप अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतं.2 / 9तुपाला जेव्हा कापूराची साथ मिळते तेव्हा तूप आणि कापूर ही जोडगोळी खरोखरच कमालीची उपयोगी ठरते. बघा तूप आणि कापूराचा एकत्र वापर केल्याने किती वेगवेगळे लाभ होतात... 3 / 9जर रात्री शांत झोप येत नसेल तर कापूर आणि तुपाचा एकत्रित दिवा तुमच्या बेडरुममध्ये लावा. कापुराच्या सुवासामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यामुळे चांगली शांत झोप लागण्यास मदत होते.4 / 9कापूर आणि तुपाचा दिवा लावल्याने वातावरण शुद्धी होते आणि घरातले डास, किटक दूर जातात.5 / 9सायनसचा त्रास होत असेल तर कापूर आणि तूप एकत्र करून त्या मिश्रणाचा सुगंध घ्या. नाक- डोकं मोकळं होण्यास मदत होईल किंवा मग कापूराची पावडर तुपात टाका आणि त्याने डोक्याला मसाज करा.6 / 9मार लागल्यामुळे सूज आली असेल तर त्याजागी कापूर आणि तुपाचं मिश्रण लावा आणि त्यावर एक कापडी पट्टी गुंडाळा. काही तासांतच सूज उतरेल.7 / 9डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कापूराची पावडर तुपामध्ये टाका आणि त्या मिश्रणाने डोक्याला मालिश करा. 8 / 9कापूर आणि तूप एकत्र करून पिंपल्स आलेल्या ठिकाणी आणि त्याच्या आजुबाजुला लावा. पिंपल्सचा त्रास कमी होईल. 9 / 9पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठीही कापूर आणि तुपाचे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications