Best Food For Bones: 9 super food that slow downs the aging process of bones and keeps bones strong
Best Food For Bones: हाडांचं एजिंग रोखणारे 9 पदार्थ.. कमी वयात म्हातारपण नको, तर 'असं' ठेवा डाएट!Published:April 4, 2022 02:50 PM2022-04-04T14:50:35+5:302022-04-04T14:57:35+5:30Join usJoin usNext १. आजकाल हाडांचं दुखणं खूप कमी वयात सुरू होत आहे.. मान दुखणं, पाठ दुखणं ही तक्रार आता पंचविशीतली तरुणाईही करू लागली आहे.. बसण्या- उठण्याच्या, चालण्याच्या चुकीच्या सवयी, दुचाकीचा वाढलेला वापर ही त्याची काही कारणे असली तरी कमी वयातच हाडांची एजिंग प्रोसेस (aging process of bones) सुरू होऊ नये म्हणून आहारातून काही पदार्थ पोटात जाणं गरजेचं आहे.. २. पहिल्या बाळंतपणानंतर तर जवळपास प्रत्येक महिला कंबरदुखी किंवा पाठदुखीची तक्रार करत असते. त्यामुळेच तर हाडांना बळकटी मिळेल असं काहीतरी आपल्या आहारात रोजच्या रोज असायलाच हवं.. ३. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असतं हे तर आपण जाणतोच. पण साधारण मध्यम आकाराची एक संत्री खाल्ली तर त्यातून आपल्याला आपल्या दिवसभराच्या व्हिटॅमिन डी च्या गरजेच्या १० टक्के आणि कॅल्शियमच्या गरजेच्या २५ टक्के मिळू शकतं, असं काही अभ्यासानुसार सांगितलं आहे. ४. बदामामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ४ ते ५ भिजवलेले बदाम खावेत. ५. बाळंतपणानंतर तर प्रत्येकीने काळे मनुके खाण्याची गरज असते. कारण मनुक्यांमध्ये असणारे ठराविक प्रकारचे फायबर हाडांच्या बळकटीसाठी प्रोत्साहन देणारे ठरते. नियमितपणे मनुक्यांचे सेवन केल्यास अर्थरायटिसचा त्रास कमी होतो. ६. हाडांसाठी आवश्यक ठरणारे पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे तिन्ही घटक केळीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ७. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात मिळावे यासाठी दुध आणि चीज, पनीर, लोणी असे दुग्धजन्य पदार्थ खाण्याची गरज आहे. ८. मशरुम हा देखील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्त्रोत आहे. बोन डेन्सिटी bone density वाढविण्यासाठी मशरुम खाण्याचा सल्ला दिला जातो. ९. पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पराठा, भाजी, सूप, पुऱ्या अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पालक नेहमीच पोटात जायला हवा.. १०. नाचणीमधून कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे लहान बालकांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच नाचणीने नियमित सेवन करायला हवे. ११. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडांसाठी कारणीभूत ठरणारे दोन्ही घटक राजगिऱ्यात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी राजगिरा खायला विसरू नका. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नHealthHealth Tipsfood