1 / 7शाकाहारी लोकांच्या शरीरात नेहमीच व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते. त्यामुळे मग हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा वाटणे असा त्रास होतो.2 / 7 व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे मूड स्विंग होण्याचे प्रमाणही खूप जास्त असते. याशिवाय या व्यक्तींना खूप जास्त डिप्रेशन येते. असे त्रास तुम्हालाही होत असतील तर व्हिटॅमिन B12 एकदा तपासून घ्यायला हवं.3 / 7 जर शरीरात व्हिटॅमिन B12 खूप कमी असेल तर ते वाढविण्यासाठी डॉक्टर काही सप्लिमेंट्सही देत असतात. पण त्यासोबतच आपल्या स्वयंपाक घरातचं असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही नियमितपणे खाल्ले तर शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून येण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते असं डॉक्टर सांगतात. डॉक्टरांनी याविषयीचा व्हिडीओ drsaleem4u या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.4 / 7यामध्ये डॉक्टर सांगतात की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास व्हिटॅमिन B12 ची कमतरता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.5 / 7मशरूममधूनही व्हिटॅमिन B12 मिळते. त्यामुळे तुमच्या आहारात मशरूम नियमितपणे असू द्या.6 / 7त्याव्यतिरिक्त बाजारात मिळणाऱ्या फॉर्टिफाइड सीरिल्स, सोया दूध आणि प्लांट बेस्ड मिल्कमधूनही पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन B12 मिळू शकते.7 / 7बाजारात न्यूट्रिशनल यीस्ट मिळते. त्यातूनही व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात मिळते. सूप किंवा त्यासारख्या वेगवेगळ्या रेसिपींमध्ये तुम्ही न्यूट्रिशनल यीस्ट घालून खाऊ शकता.