दुपारी जेवताना दही खाता? ५ चुका करु नका, पचनासह आतड्यांवर होणारे दुष्परिणाम टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:57 AM 1 / 6उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता दुपारच्या जेवणात अनेकजण दही खातात. तब्येतीला थंड म्हणून लस्सी पिण, दही खाणं चांगलं असतं. जर दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर तब्येतीचा नुकसान होऊ शकतं. (healthy ways to eat curd Which is the best way to eat curd) आयुर्वेदात दही खाण्याचे एकापेक्षा एक फायदे सांगितले आहेत. (Which is the best way to eat curd)2 / 6 १) दही गरम करणं टाळा. दही असंच थंड खाल्लं जातं. पण काही पदार्थ बनवताना दही गरम केलं जातं. जर तुम्ही दह्याचं मिश्रण गरम केलं तर तुमच्या तब्येतीसाठी हानीकारक ठरू शकतं. डॉक्टरांच्यामते दही गरम केल्यानं त्यातील काही गुण नष्ट होतात. 3 / 6२) लठ्ठपणा, कफ विकार, रक्तस्त्राव विकार, सूज यांसारख्या आजारांनी पिडीत असलेल्या लोकांनी दह्याचं सेवन करू नये. यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. 4 / 6३) दही फळांसोबत खाऊ नये, ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. फळांसह दह्याचे दीर्घकाळ सेवन केल्याने चयापचय समस्या आणि एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.5 / 6४) दही कधीही मांस आणि माश्यांसोबत खाऊ नये. चिकन, मटण किंवा मासे यांसारख्या मांसासोबत शिजवलेले दह्याचे कोणतेही मिश्रण शरीरात विषारी पदार्थ तयार करते.6 / 6बरेच लोक विचार न करता आणि मोठ्या प्रमाणात, विशेषतः रात्रीच्या वेळी दही खातात. त्यामुळे दही खायचे असेल तर ते अधूनमधून, दुपारी आणि कमी प्रमाणात खावे. जर तुम्हाला दही खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ताक. दुपारच्या जेवणात ग्लासभर ताक पिऊन तुम्ही शरीराला फायदे मिळवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications