Join us

कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे सतत ठणकतात? ५ पदार्थ खा- हाडांचं दुखणं विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2024 16:47 IST

1 / 8
बसताना, उठताना पाठ- कंबर खूप दुखणे, अगदी गुडघेही ठणकतात अशी तक्रार आता कमी वयातले अनेक जण करत आहेत. अगदी तिशी ओलांडली की हे त्रास सुरू झाले आहेत.
2 / 8
हाडं एवढी कमजोर होण्याचं कारण म्हणजे आहारातून पुरेसं पोषण न मिळणं. म्हणूनच असे काही पदार्थ आपल्या आहारात असायलाच पाहिजेत जे आपल्या हाडांना बळकटी देण्याचं काम करतील. त्यामुळे हाडांना एवढी ताकद मिळेल की कॅल्शियमच्या गोळ्यांचा डोस घेण्याची गरज कधीही पडणार नाही.
3 / 8
कॅल्शियमचा खच्चून डोस देणारे पदार्थ म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. त्यामुळे दररोज दूध तर प्या, पण त्यासोबतच पनीर, चीज, तूप असे पदार्थही नियमितपणे खा.
4 / 8
गूळ आणि शेंगदाणे यांचा एकत्रितपणे लाडू करून ठेवा. दररोज एक लाडू खा. हाडांना तर मजबूती मिळेलच पण शरीरातील लोह वाढून रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
5 / 8
सुर्यफुलाच्या बियांमधूनही भरपूर कॅल्शियम मिळते.
6 / 8
बदाम हा देखील कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी खा
7 / 8
कॅल्शियमच्या जोडीला व्हिटॅमिन डी देखील गरजेचे आहे. हे दोन्ही घटक जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात मिळतात तेव्हा हाडं ठणठणीत राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी देणारे पदार्थ खा. हिरव्या पालेभाज्या आहारात नियमितपणे असू द्या.
8 / 8
व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी कोवळ्या उन्हात जाऊन तुम्हाला आवडेल तो व्यायामही जरुर करा. हाडं दणकट होतील.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाठीचे दुखणे उपायदूध