दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:32 PM 1 / 7दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पारंपारीक उपायांचा वापर पूर्वापार केला जात आहे. महागड्या दातांच्या ट्रिटमेंट्स घेण्याआधी तर काही घरगुती आयुर्वेदीक उपाय दातांवर केले तर दातांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि खर्च न करता चमकदार सुंदर दात मिळतील. 2 / 7 दात सुंदर दिसावेत यासाठी रोज काही पानं चावून तुम्ही खाऊ शकता. ही पानं खाल्ल्याने दातांचा पिवळा थर आपोआप निघून जाईल आणि पांढरे दात दिसतील.3 / 7जांभूळाची पानं रोज चावून खाल्ल्याने दातांतील प्लाक कमी होतं. ज्यामुळे दातांची स्वच्छता चांगली राहते.4 / 7तुळशीची पानं चावून खाल्ल्याने दातांचा रंग सुधारण्यास मदत होते. अनेक टुथपेस्टमध्ये तुळशीचा अर्क वापरला जातो. ज्यामुळे दात चांगले राहतात. 5 / 7हिवाळ्याच्या दिवसांत दात स्वच्छ करण्यासठी तमालपत्र उत्तम आहे. तमालपत्राचा वापर करून तुम्ही दात अगदी सहज स्वच्छ करू शकता. 6 / 7संत्र्याच्या सालीची पावडर आणि तेजपत्ता मिसळून दात घासा. ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल.7 / 7पुदिन्याची पानं चावून खाल्ल्यानं दात स्वच्छ होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications