सतत पोट फुगतं? ब्लोटिंगचा त्रास? ‘ही’ सोपी योगासनं करतील त्रास कमी लवकर
Updated:February 6, 2025 20:39 IST2025-02-06T20:22:37+5:302025-02-06T20:39:00+5:30
Constantly feeling bloated ? ..Do these simple yoga poses.. you will get relief : सात अशी योगासने जी केल्याने पोटाच्या समस्या होतील दूर.

सतत पोट डप्पडप्प होतं का? तुम्हाला नक्कीच ब्लोटींगचा त्रास आहे. पोटं फुगतं आणि दुखतं.
औषधांनी बरं होत नाही. तात्पुरता आराम मिळतो, पण परत दुखायला लागते.
योगासनाने ही समस्या कायमची बंद होईल. सात आसनं आहेत जी केल्याने ब्लोटींग होणार नाही.
१.अपानासन
गुडघे छातीजवळ आणून धरायचे. कंबरेवर ताण पडू द्यायचा. पचनासाठी चांगले असते.
२. आनंद बालासन
पाठीवर झोपा. मग गुडघे वाकवून पाय धरा. पाय तळव्याच्या बाजूला धरा. श्वासावर लक्ष ठेवा.
३.वक्रासन
पाठीचा कणा वळवायचा. बसून करायचे आसन आहे. एक हात मागे एक पायाशी ठेवायचा.
४.अधोमुख स्वानासन
अधो म्हणजे खाली, मुख म्हणजे चेहरा, स्वान म्हणजे कुत्रा यामध्ये जमिनीकडे तोंड करून शरीराचा मधला भाग वर उचलायचा.
५.बालासन
लहान मुलांसारखे गुडघ्यावर बसा. मग डोकं जमिनीला लावून हात समोर लांब करा.
६. सेतू बंध सर्वांगासन
सरळ झोपा नंतर पोट आणि कंबर वर उचला. पाठीचा कणा लवचिक होतो.
७. प्रसारिता पदोत्तनासन
पाय रूंद करून पुढे वाका. हात जमिनीला टेकवा.