१ पैसाही खर्च न करता करा १ मिनिटाचा जादूई उपाय, केस-त्वचा तर छान होईलच! तब्येतही होईल दणकट
Updated:April 14, 2025 16:09 IST2025-04-14T12:34:28+5:302025-04-14T16:09:00+5:30

सध्या प्रत्येकाचीच जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींच्या तक्रारी कमी वयातच सुरू झालेल्या आहेत.
या तक्रारी दूर करण्यासाठी नेहमीच महागडे उपचार घेण्याची गरज नसते. योगा किंवा व्यायाम या माध्यमातून आपण आपले अनेक शारिरीक, मानसिक त्रास कमी करू शकतो..
ते नेमके कसे करायचे याविषयीची माहिती तज्ज्ञांनी healingtaichimastery या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आपल्या चेहऱ्यावरचे काही विशिष्ट पॉईंट्स दाबले तर बऱ्याच शारिरीक समस्या दूर करता येतात..
जर नाकाच्या आसपासचा भाग दोन्ही हातांच्या एका बोटाने आपण वर- खाली या पद्धतीने काही सेकंदांसाठी नियमितपणे दाबला तर त्यामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात.
कपाळावर जर गोलाकार पद्धतीने मसाज केला तर चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या येण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
दोन्ही हातांचे पहिले बोट आणि मधले बोट हे तुमच्या कानाच्या मागे- पुढे ठेवा आणि वर- खाली या पद्धतीने मालिश करा. किडनी संबंधित त्रास कमी होऊ शकतात.
कानाच्या वर जो डोक्याचा भाग असतो त्या ठिकाणी बोटांच्या टोकाने गोलाकार मसाज करा. केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होईल.
जॉ लाईनला मसाज केल्यास जॉ लाईन चांगली होऊन चेहरा आणखी रेखीव दिसतो. तसेच गालही ओघळल्यासारखे दिसत नाहीत.