हाडांतील कॅल्शियम शोषतात हे '६' पदार्थ, ऐन तारुण्यात हाडं ठणकतील - कंबर, गुडघ्याची दुखणी वाढेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 4:30 PM 1 / 9कॅल्शियम (Calcium) हे एक खनिज आहे. जे दात आणि हाडांच्या रचनेसाठी आवश्यक आहे. यामुळे हाडं निरोगी आणि दात मजबूत होतात. कॅल्शियममुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो(Did you know that certain foods block calcium absorption?).2 / 9कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते, बीपी वाढू शकतो. स्नायुंमध्ये पेटके येऊ शकतात, हाडे आणि दात कमकुवत होतात. 3 / 9त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ खात राहायला हवे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता भासली तर, आरोग्यात बरेच बदल घडू शकतात. असे बरेच पदार्थ आहेत, जे हाडातून कॅल्शियम शोषून घेतात. कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी नक्की कोणते पदार्थ खाणं टाळावे?4 / 9मीठ मूत्राद्वारे कॅल्शियमचे उत्सर्जन वाढवते, ज्यामुळे कालांतराने हाडं ठिसूळ होतात. चिप्स, प्रक्रिया केलेले पदार्थ, सूप आणि फास्ट फूड यांसारखे पदार्थ खाणं टाळा. यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. 5 / 9कार्बोनेटेड शीतपेयांमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियम-फॉस्फरसचे संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे हाडं कमजोर होतात.6 / 9कॅफिनमुळे कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते. जास्त प्रमाणात कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेय प्यायल्याने हाडं कमकुवत होतात. 7 / 9मिठाईचे जास्त सेवन केल्याने कॅल्शियमचे शोषण कमी होते आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. केक, कँडी आणि कुकीज यांसारख्या गोष्टी खाणं टाळा. 8 / 99 / 9व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. म्हणूनच व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून कॅल्शियमची पातळी वाढू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications