1 / 9नुकत्याच वयात आलेल्या मुलींना मासिक पाळीचा खूप त्रास होतो. आधीच शरीरात झालेला हा बदल स्विकारणं त्यांना थोडं कठीण जातं. त्यात पाळीच्या चार दिवसात खूप जास्त पोट दुखतं. पाठीत आणि कंबरेतही वेदना होतात. (Rujuta Divekar suggests best food for reducing menstrual pain)2 / 9काही मुलींचं तर एवढं जास्त पोट दुखतं की शाळा बुडवून त्यांना घरीच थांबावं लागतं. तुमच्याही लेकीला असाच त्रास होत असेल तर तिला आपल्या स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ नियमितपणे खाऊ घाला. यामुळे तिची पाळीतली पोटदुखी नक्कीच कमी होईल असं आहारतज्ज्ञ रुजूता दिवेकर सांगतात.(superfood of Adolescent girls )3 / 9रुजूता दिवेकर सांगतात की वाढत्या वयातल्या मुलीला दररोज नाचणीचा किंवा राजगिराचा लाडू खायला द्या. यातून त्यांना भरपूर प्रमाणात लोह मिळतं4 / 9 त्याचबरोबर मुलींच्या आहारातलं बिस्किटांचं प्रमाण कमी करा. ते कमी झालं तरच नाचणी किंवा राजगिऱ्यातून मिळणारे कॅल्शियम, लोह शरीरात व्यवस्थित शोषून घेतले जाते. 5 / 9वयात आलेल्या मुलींना दररोज मुठभर शेंगदाणे किंवा मूठभर फुटाणे खायला द्या. यातून त्यांना चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतील.6 / 9तिसरा पदार्थ म्हणजे आवळ्याचं सरबत किंवा लिंबू सरबत. यामुळे मुलींना व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळतं. व्हिटॅमिन सी शरीरात गेल्यामुळे लोह शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जातं. त्याबरोबरच बाटली बंद कोल्ड्रिंक्स, सरबते घेणं बंद करावे. 7 / 9चौथा पदार्थ म्हणजे खजूर, खारीक किंवा काळे मनुके यांच्यापैकी कोणताही एक पदार्थ रोज खावा.8 / 9रोज कोणते ना कोणते हंगामी फळ खाल्लंच पाहिजे. यात सफरचंद, बेरीज अशी महागडीच फळं खा असं मुळीच नाही. तुमच्या आसपास जे फळं अगदी सहज आणि स्वस्त मिळतात ते ताजो फळ रोज खा9 / 9एक लहान वाटी भरून दही किंवा एक ग्लास भरून ताक नियमितपणे घ्या. त्यामुळे व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम शरीरास योग्य प्रमाणात मिळतात.