Join us

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा!‘ दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 15:39 IST

1 / 8
अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते.(Rose tea benefits for skin)
2 / 8
अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. (How rose tea reduces stress)
3 / 8
गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते.
4 / 8
रोज कपभर गुलाबी चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो तर मानसिक तणाव देखील कमी होतो.
5 / 8
गुलाबी चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराला होणाऱ्या हानिकारक घटकांपासून वाचवतात. या चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन देखील वाढत नाही.
6 / 8
गुलाबी चहा प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रेरॉल कमी होऊन हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणारा रोगांचा धोका कमी होतो.
7 / 8
या गुलाबी चहामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, मध, पाणी, दालचिनी आणि वेलची असल्यामुळे याचा सुगंध चांगला असतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत होते.
8 / 8
गुलाबी चहामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. त्यामुळे याचा आपल्या त्वचेला फायदा होतो. यात असणारे एंटी-इंफ्लेमेटरी गुण आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स