Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

Updated:January 1, 2025 14:42 IST2025-01-01T14:35:02+5:302025-01-01T14:42:49+5:30

Beauty and Fitness: लहान मुलांबरोबरच कॉलेज वयीन मुलं आपल्याला ऐन चाळीशीत काकू, मावशी, आंटी म्हणू लागले की 'खरंच आपण पोक्त दिसतोय का?' हा विचार मनात येतो. कोणी काय म्हणावं हे आपण सांगू शकत नाही, पण चाळिशीनंतरही फिटनेस कसा जपता येईल यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. नवीन वर्ष सुरु झालेच आहे, चला तर आपल्या संकल्पाच्या यादीत 'सेल्फकेअर' या संकल्पाला प्राधान्य देऊया आणि त्यासाठी आपले रुटीन सेट करूया.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

आपल्यासमोर पन्नाशीतल्या बोल्ड, ब्युटीफुल दिवा मलायकाचे उदाहरण असताना ऐन चाळीशीत हार कशाला मानायची? दैनंदिन जीवनात मोजके बदल केले तरी फिटनेस राखणे सहज शक्य होईल. त्यासाठी जिम, झुंबा क्लास, योगा क्लास लावायलाच हवा असे नाही. आवड म्हणून जरूर शिका, पण रोजची कामं सांभाळून स्वतःसाठी वेळ कसा देता येईल, हे जाणून घेण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

जिरे, बडीशेप, धणे आणि ओवा भाजून त्याची पूड करून ठेवा आणि रोज रात्री एक चमचा ही पूड पेलाभर पाण्यात टाकून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. त्यानंतर तासाभराने चहा प्या. या ड्रिंकमुळे वाताचा त्रास होणार नाही आणि कॉन्स्टिपेशनचा त्रासदेखील होणार नाही.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

स्वतःचा डबा, मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांसाठी जेवण ही न संपणारी कामं आहेत. मात्र यातच दिवस संपणार असेल तर तुमची फिटनेसची सुरुवात कधीच होणार नाही. याच घाई गडबडीतून स्वतःसाठी वेळ शोधा आणि जास्तीत जास्त २० मिनिटं आणि कमीत कमी १० मिनिटं मॉर्निंग वॉकला जा. निसर्गाचा अनुभव घ्या, सकाळचा गारठा तुमच्या तना-मनाला तजेला देईल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मिळेल.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

नाश्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर उपमा, पोहे, डोसे, धिरडी असे पदार्थ येतात, मात्र वास्तविक पाहता आपले दैनंदिन काम, श्रम पाहता सकाळच्या वेळी आपल्याला चार भिजवलेले बदाम, २ खजूर, २ काजू किंवा मूठभर शेंगदाणे आणि गूळ एवढाच नाश्ता पुरेसा असतो आणि तो ऊर्जावर्धकही असतो. सकाळी नाश्ता झाल्यावर झोप येणार असेल तर तो आहार आपल्यासाठी अयोग्य समजावा.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

व्यायामाचा कितीही कंटाळा येत असला तरी श्वसनाचे व्यायाम आणि योगासने यासाठी २० मिनिटे द्यायलाच हवीत. सकाळी चालायला गेलो म्हणून व्यायामच करायचा नाही असा विचार चुकीचा आहे. मन शांत ठेवण्यासाठी, हॉर्मोन संतुलित ठेवण्यासाठी श्वसनाच्या व्यायामाचा लाभ होतो आणि वाढत्या वयात शरीर लवचिक ठेवण्यासाठी योगाभ्यासाचा उपयोग होतो.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

वॉशिंग मशीन आल्यापासून कपडे हाताने धुण्याचा सराव सुटला. त्यामुळे हात, पाय, पोटाचा होणारा आयता व्यायाम बंद झाला. बेली फॅट अर्थात पोटावरची, मांड्यांवरची चरबी वाढू लागली. ती कमी करण्यासाठी रोज अंघोळीला गेल्यावर निदान स्वतःचे रोजच्या वापरातले कपडे उकिडवे बसून धुण्याचा सराव करा. पूर्ववत दिसू लागाल!

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

वर म्हटल्याप्रमाणे सकाळी जुजबी नाश्ता केल्याचा केल्याचा फायदा म्हणजे सकाळी ११ वाजता भूक लागेल. दुपारच्या जेवणासाठी ती योग्य वेळ असते. दुपारचे जेवण १२ च्या आत जेवून घ्या. जेवणात दही, ताक, कोशिंबीर, सॅलेड याचा अधिक प्रमाणात समावेश करा. जेवताना पोळी आणि भात एकत्र खाऊ नका, एका वेळी एकच पूर्णान्न घ्या.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

दुपारी १० ते २० मिनिटे शरीराला विश्रांती हवीच. तुम्ही वर्किंग असाल तर बसल्या जागी १० मिनिटे डोळे बंद करून आराम द्या. त्यामुळे फ्रेश वाटेल आणि पुढच्या कामांसाठी तुम्ही सज्ज व्हाल.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्याने शरीराचा खालचा भाग वाढू लागतो, स्थूलत्त्व येतं, वजन वाढ होते आणि मुख्य म्हणजे आळस भरतो. म्हणून दर एका तासाने जागेवरून उठून पाय मोकळे करावे. चालावे. छोटी कामे उरकून घ्यावीत. मात्र सलग तीन चार बसू नये.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

रात्री शक्यतो हलके जेवण घ्यावे. मूग डाळीची खिचडी, मऊ भात, आंबील, उकड असे पदार्थ चवीला रुचकर आणि पचायला हलके असतात. जेवणात अशा पदार्थांचा समावेश करावा. जेवणानंतर गोड खाण्याची सवय टाळावी, गोड खायचेच असेल तर संध्याकाळ होण्याच्या आत खावे, रात्री गोड खाणे टाळावे. जितके जास्त गोड खाल तेवढ्या लवकर त्वचेला सुरुकुत्या सुरु होतील, हे लक्षात ठेवा, शिवाय आजारांना आमंत्रण मिळेल.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

जेवणानंतर दहा मिनिटं वज्रासनात बसा. दात स्वच्छ घासा. दुसऱ्या दिवशीची कपडे, डबे, नाश्ता यासाठी लागणारी पूर्व तयारी करून रात्री १०.३०ला झोपी जावे. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत झोपल्याने हॉर्मोन्स संतुलित राहतात.

Fitness:चाळिशीनंतर फॉलो करा 'हे' रुटीन, कोणीही म्हणणार नाही 'काकूबाई'; घ्या एक महिन्याचं चॅलेंज!

तुम्हाला खोटे वाटेल, पण फक्त महिनाभर हे रुटीन पाळले, तरी तुमच्यात लाक्षणिक बदल दिसू लागतील आणि 'आंटी मत कहो ना' हे सांगण्याची वेळही येणार नाही. तुमचा फिटनेस जपण्याच्या या संकल्पपूर्ती साठी नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!