Join us

आताच द्या लक्ष! फक्त जास्त खाल्ल्याने वाढत नाही लठ्ठपणा; रोजच्या जगण्यातील 'या' ४ चुका जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:16 IST

1 / 11
लठ्ठपणा ही वेगाने वाढणारी समस्या आहे, जी अनेक धोकादायक आजारांना जन्म देते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील प्रत्येक आठवा व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. त्यामुळे कॅन्सर, हार्ट डिजीज आणि डायबेटीसचा धोका वाढत आहे.
2 / 11
जास्त खाल्ल्याने किंवा खाण्याबाबतच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढतो असा एक सामान्य समज आहे पण तसं नाही. अनुवांशिक कारणांमुळेही काही लोकांमध्ये लठ्ठपणा वाढतो. काही चुकांमुळेही लठ्ठपणा वाढतो.
3 / 11
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जास्त खाणं हे लठ्ठपणाचं एक कारण आहे. याशिवाय शारीरिक हालचाली न करणं, पुरेशी झोप न मिळणं, स्ट्रेस, डिप्रेशन आणि खराब लाईफस्टाईल ही देखील त्याची कारणं आहेत.
4 / 11
रात्री उशिरापर्यंत जागणं, मोबाईल वापरणं, चित्रपट पाहणं हे तुम्हाला सामान्य वाटेल पण त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. खरं तर झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू लागतं.
5 / 11
भूक वाढवणारा हार्मोन घरेलिन अधिक सक्रिय होतो. यामुळे क्रेविंग वाढतं आणि लठ्ठपणा, वजन वाढतं. म्हणून प्रत्येकाने ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे.
6 / 11
डॉक्टरांचे म्हणणं आहे की, आजकालच्या या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक स्ट्रेस घेतात, जे लठ्ठपणाचं कारण बनू शकतं. ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे फॅट जमा होऊ लागतात.
7 / 11
जेव्हा हे फॅट पोट आणि कंबरेजवळ मोठ्या प्रमाणात जमा होतात तेव्हा ते लठ्ठपणाचं कारण बनतं. स्ट्रेस टाळण्यासाठी, योग आणि मेडिटेशन नियमितपणे केले पाहिजे.
8 / 11
जर तुम्ही आळशी असाल आणि दिवसभर एकाच ठिकाणी पडून फोन आणि टीव्ही वापरत असाल तर लठ्ठपणा वेगाने वाढू शकतो.
9 / 11
शारीरिक हालचाल कमी होते आणि कॅलरीज बर्न होत नाहीत. म्हणूनच डॉक्टर दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करण्याचा सल्ला देतो.
10 / 11
आजकाल लोकांच्या जेवणाच्या वेळाही निश्चित नसतात. योग्य आहार नसतो. फास्ट फूड जास्त खाल्लं जातं. दुपारच्या जेवणाच्या वेळी नाश्ता आणि रात्री उशिरा जेवण केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
11 / 11
खाण्याच्या वेळेत व्यत्यय आल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे शरीरात फॅट जमा होतात. अशा परिस्थितीत, जेवणाची वेळ ठरवावी आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान २-३ तास ​​आधी जेवण करावं.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स