Join us   

जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:39 AM

1 / 8
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांच्या जेवणाच्या वेळा चुकतात, वेळेवर जेवण न केल्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळायचं जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही आणि पचनक्रिया व्यवस्थित राहिल. (Health Tips)
2 / 8
जेवल्यानंतर अनेकांना कपभर चहा पिण्याची सवय असते. यामुळे फ्रेश वाटतं असा लोकांचा समज असतो. पण यामुळे अन्न पचण्यात अडथळे येतात.
3 / 8
जेवल्यानंतर बसून राहणं खूप चुकीचं आहे. यामुळे फक्त वजन वाढत नाही तर पचनक्रिया सुद्धा बिघडते. तर जेवल्यानंतर चालण्याची सवय असायला हवी.
4 / 8
जेवणानंतर जवळपास १ तास चहा किंवा कॉफी घेऊ नये. यामुळे पोषक तत्वांची कमतरता उद्भवते.
5 / 8
जेवल्यानंतर लगेचच जास्त पाणी प्यायल्यामुळे एसिड पातळ होऊन पचन क्रियेवर परिणाम होतो. खाल्लेल्या अन्नाचं वेगानं पचन होत नाही.
6 / 8
जेवल्यानंतर लगेच कोणताही व्यायाम करू नये. यामुळे गॅस, सुस्ती येणं, ढेकर येणं असा त्रास उद्भवतो. म्हणून जेवल्यानंतर अर्धा ते १ तास गॅप ठेवून व्यायाम करायला जावे.
7 / 8
जेवल्यानंतर जर तुम्ही दात घासत नसााल दात आणि हिरड्या यामुळे कमकुवत होऊ शकतात. जेवल्यांतर दातांमध्ये अन्न अडकते त्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो.
8 / 8
जेवून लगेच बेडवर झोपणं ही चुकीची सवय आहे. यामुळे छातीत जळजळ एसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो. अन्न पचनाच्या क्रियेत बाधा येते.
टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स