नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

Published:October 25, 2024 04:40 PM2024-10-25T16:40:09+5:302024-10-25T19:01:46+5:30

Foods that have 10 time extra nutrition when sprouted

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

प्रथीनांचा भरपूर साठा असणारे कडधान्ये पचायला जड जातात असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, याच कडधान्यांना जेव्हा मोड आणले जातात तेव्हा ते पचायला तर सोपे होतातच. पण मोड आल्याने त्यांचे पोषकतत्व हे दहापट वाढतात. तर अशी कोणती कडधान्ये आहेत जाणून घेऊया (Foods that have 10 time extra nutrition when sprouted)..

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की हिरवे मूग हे पचायला हलके आणि भरपूर पोषक असतात. यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. पण नुसत्या हिरव्या मुगापेक्षा मोड आलेले मूग हे 20 पट अधिक विटामीन सी ने युक्त असतात. शिवाय यात मोठ्या प्रमाणात फायबर, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

हरभर्‍यात नैसर्गिकरीत्याच मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हीटॅमिन बी आणि फोलेट असते. मोड आलेले हरभरे खाल्ल्याने पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखर नियंत्रित होते व पोटाचे आरोग्य सुधारते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

नाचणी मुळातच फार पोषक असते. याला मोड आणल्याने त्यात अजून भर पडते. मोड आलेली नाचणी खाल्ल्याने शरीराला झिंक, लोह आणि कॅल्शियमचा उत्तम पुरवठा होतो. यामुळे आवश्यक अमिनो अॅसिड मिळते. संपूर्ण आरोग्य सुधारणेसाठी हे अत्यंत उपयुक्त अन्न आहे.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

हे भरपूर पोषणमूल्य असणारे धान्य आहे. मोड आणल्यावर त्यात वाढ होते. यात मोठ्या प्रमाणात आवश्यक अमिनो अॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनिरल, अँटीऑक्सिडंट्स, फायबर असते. शिवाय हे ग्लुटन फ्री असते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

मोड आलेला अख्खा मसूर हा उच्च पोषकतत्वांनी भरलेला असतो. प्रोटीन, फायबर, व्हीटामीन बी 6, लोह, फोलेट यात मोठ्याप्रमाणात असते. यामुळे पचन सुधारते, पोटाचे आरोग्य सुधारते शिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

मोड आलेला पांढरा वाटाणा हा भरपूर पोषक असतो. यात भरपूर प्रोटीन, फायबर, आवश्यक व्हीटामिन्स जसे व्हीटामीन सी व के असतात. यामुळे पोटाचे व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

राजगिरा आरोग्यासाठी कधीही उपयुक्तच असतो. त्यात जर त्याला मोड आणले तर अधिक पोषक ठरतो. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते. शिवाय हे ग्लुटन फ्री देखील असते.

नुसती भिजवून नाही तर मोड आणूनच खा कडधान्यं, ‘ही’ कडधान्ये मोड आल्याने होतात दसपट पौष्टिक

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी उपयुक्त असतेच पण जर त्यांना मोड आणले तर त्यातील पोषण अनेक पटींनी वाढते. असे मोड आलेले शेंगदाणे खाणे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरते. यात मोठ्याप्रमाणात अॅंटी ओक्सिडंट्स असतात.