Join us   

सतत थकल्यासारखं वाटतं, व्हिटामिन B-12 कमी झाले? ८ पदार्थ खा, भरपूर वाढेल B-12

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 9:33 AM

1 / 9
रोजच्या आहारातून शरीराला पोषक तत्व मिळाले नाही की अशक्तपणा, थकवा येणं अशी लक्षणं जाणवतात. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास व्हिटामीन्स, मिनरल्सची कमतरता भरून काढता येते. यामुळे ताण-तणाव, चिडचिड, कमकुवतपणा कमी होतो.(Foods You Should Eat if You Have a B12 Deficiency)
2 / 9
थियमिन व्हिटमीन ग्लूकोज एनर्जी लेव्हल वाढवण्यास आणि शरीराचे कार्य सुरळीत करण्यात मदत करते. यात तिळाच्या बीया,नट्स, यीस्ट, शेंगा यांचा समावेश आहे.
3 / 9
राइबोफ्लेविन त्वचा आणि केसांसाठी हेल्दी मानले जाते. दूध, अंडी, दही, हिरव्या पाले भाज्यांमधून हे मोठ्या प्रमाणात मिळते.
4 / 9
नियासिनच्या मदतीने शरीर कार्ब्स, फॅट बनवते. मासे, दूध, अंडी, मशरूम, नट्स आणि प्रोटीन फुड्समध्ये व्हिटामीन बी-३ असते.
5 / 9
पँटोथेनिक एसिडमुळे लाल रक्त पेशी आणि स्टेरॉईड्सचे उत्पादनं होते. म्हणूनच, शेंगदाणे, भाज्या, दूध यांचे सेवन करायला हवे.
6 / 9
पायरिडोक्सिन रेड ब्लड सेल्स तयार करण्याचे आणि प्रोटीन्स पचवण्याचे काम करते. हिरव्या पालेभाज्या, मासे, नट्स, शेंगा, फळं यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन बी-६ असते.
7 / 9
बायोटिनची कमतरता दूर करण्यासाठी फूल कोबी, शेंगदाणे, यीस्ट, मशरूम खायला हवेत हे फॅट्स, अमिनो एसिड, ग्लायकोजन शोषून घेण्यासाठी महत्वाचे ठरतात.
8 / 9
शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी फोलेटची आवश्यकता असते. पालेभाज्या, नट्स, सीड्स आणि आंबट फळं खाल्ल्याने याची कमतरता दूर होते.
9 / 9
व्हिटामीन बी-१२ मेंदूच्या कार्यासाठी तसंच रक्त तयार करण्याासाठी फार महत्वाचे आहे. हे वाढवण्यासाठी दूध, फोर्टिफाईड फूड, चिझ, अंडी, भाज्या खाऊ शकता.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स