Join us   

डायबिटीसच्या भितीनं गोड खाणं सोडलंय? रोज 'ही' ५ फळं खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 3:13 PM

1 / 7
डायबिटीस असणं म्हणजे नॉर्मल शुगर लेव्हलपेक्षा शरीरात साखरेचं प्रमाण जास्त असणं. शरीरात साखरेचं प्रमाण जास्त असल्यास हा आजार उद्भवतो. शुगर लेव्हल वाढल्यानं जीवघेणे आजार उद्भवू शकतात. डायबिटीसच्या रुग्णांनी फळ खावीत की नाही याबाबत अनेक समज गैरसमज लोकांच्या मनात असतात. ( Nutritionist lovneet batra shared 5 fruits for diabetics)
2 / 7
आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्यामते डायबिटीसमध्ये तुम्ही तुमची आवडती फळं खाणं टाळण्याची काही गरज नाही.तुम्हाला मधुमेह असला तरीही फळे तुमच्या आहाराचा भाग असू शकतात आणि असावीत, विशेषत: कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे. साखरेला अनुकूल फळांचे काही पर्याय शेअर केले आहेत, ज्यांचा आहारात समावेश करू शकता. (Fruits for diabetes)
3 / 7
संत्र्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. संत्री व्हिटामीन सी चा प्रमुख स्त्रोत आहे. शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी, हाडे आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय, त्याच्या सेवनाने फायबरचा चांगला डोस देखील मिळतो, जो पचनासाठी आवश्यक असतो.
4 / 7
हे छोटंस फळ अनेक पोषक तत्वाचं भांडार आहे. चेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त २० असतो. यामुळे शुगर लेव्हल वाढण्याचा धोका नसतो. यातील पोटॅशियम, एंटीऑक्सिडंट्स, फायबर्स इम्यून सिस्टिम आणि हृदयाचं आरोग्य चांगले ठेवतो.
5 / 7
पिअरमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पिअरचा ग्लायसेमिक इंडेक्स ३८ असतो.त्यामुळे मधूमेहाच्या रूग्णांसाठी याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
6 / 7
ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड स्केल दोन्हीवर सफरचंद तुलनेने कमी गुण मिळवतात. त्यामुळे रक्तातील साखरेवर त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही. अशा स्थितीत मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात.
7 / 7
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या बेरी उत्तम असतात. कारण त्यामध्ये इतर फळांपेक्षा कमी साखर आणि भरपूर फायबर असते. स्ट्रॉबेरीचा GI 41 असतो आणि त्यात संपूर्ण संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते.
टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स