तिखटमीठाच्या डब्यातले मसाले घेतील तुमच्या आरोग्याची काळजी, पाहा आजीने सांगितलेले औषधी उपाय - मुलांसाठीही गुणकारी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 2:12 PM 1 / 9सगळ्यांच्याच किचनमध्ये कायम एक मसाल्यांचा वेगळा गोलाकार डबा असतो. या डब्यात आपण सुके किंवा खडे मसाले भरुन स्टोअर करून ठेवतो. किचनमधील मसाल्यांचा आपण अनेक प्रकारे वापर करु शकतो. मसाल्यांच्या डब्यांतील मसाले हे फक्त पदार्थांची चव वाढवण्यापुरतेच नाही तर लहान - मोठ्या शारीरिक समस्यांवर औषध म्हणून देखील फायदेशीर ठरतात. सर्दी, खोकला, वेदना, पचनसमस्या, पोटाचे विकार आणि इतर आजारांपासून आराम मिळवून देतात. आजकाल गरज पडली की लगेचच घरोघरी औषधे पोहोचवली जातात, पण आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणारे मसाले देखील कुठल्याही औषधापेक्षा कमी नाहीत. मसाल्यांच्या डब्यांत असणाऱ्या मसाल्यांचा औषध म्हणून नेमका कसा वापर करु शकतो ते पाहूयात(The Hidden Benefits Of Garam Masala Spicing Up Your Health).2 / 9 आजीबाईच्या बटव्यामधील उपायांमध्ये हळदीला विशेष असे स्थान आहे. हळदीमध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास मदत करतात. टूथपेस्ट असो किंवा चेहऱ्यावर लावले जाणारे क्रिम असो हळदीचा वापर सगळ्या गोष्टीत केला जातो. दुधात हळद मिसळून प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, दमा यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. 3 / 9काळीमिरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे शरीराला मौसमी आजारांपासून बचाव करतात. काळीमिरीचा रोजच्या आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. याचबरोबर पचनशक्ती सुधारण्यासोबतच गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. काळ्यामिरीमध्ये पाइपरिन नावाचे तत्व असते, जे पचनशक्ती वाढवते आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते.4 / 9दालचिनीचा उपयोग फक्त स्वयंपाकातच नाही तर आरोग्य सुधारण्यासाठीही केला जातो. दालचिनी ही अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध असते, जी अनेक शारीरिक संसर्गापासून लढण्यास मदत करते. लठ्ठपणा आणि गॅसची समस्या कमी करण्यासाठी देखील दालचिनी फायदेशीर मानली जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील दालचिनी अतिशय उपयोगी ठरू शकते, कारण दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.5 / 9लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे ती अनेक आजरांवर औषध म्हणून वापरली जाते. लवंगात युजेनॉल नावाचे तत्व असते, जे दातदुखीपासून आराम देण्यास मदत करते. लवंगचा वापर आपण चहा सोबतच इतर अन्नपदार्थांमध्ये देखील करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांमध्ये लवंग अतिशय उपयुक्त असा एक खास मसाल्याचा पदार्थ आहे. लवंग आपल्या शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते. आपल्या रोजच्या आहारात लवंगाचा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 6 / 9जायफळ हा मसाल्यांच्या पदार्थांमधील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. जायफळ निद्रानाश, सांधेदुखी आणि वजन कमी करण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी दुधात जायफळ मिक्स करुन घेतल्यास निद्रानाशपासून आराम मिळतो. जायफळातील मायरीस्टिसिन नावाचे घटक मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल आणि त्याला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही जायफळ चोळून मुलाच्या नाकाला किंवा डोक्याला लावू शकता. 7 / 9मेथीच्या दाण्यांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. मेथीचे दाणे रोज खाल्ल्याने पचनाच्या समस्या, विशेषतः गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो. मेथीसाचे दाणे पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे दाणे देखील उपयुक्त मानले जातात.8 / 9जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चांगला फरक पडू शकतो. 9 / 9हिंगाला सुवासिक असा वास असतो, पचन सुधारण्यासाठी विविध अन्नपदार्थांमध्ये हिंगाचा उपयोग केला जातो. रोजच्या आहारात हिंगाचा वापर केल्याने पचनसंस्था मजबूत होते. तसेच पोटदुखीवर देखील हिंग हा रामबाण उपाय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications