गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

Published:November 28, 2022 11:52 AM2022-11-28T11:52:41+5:302022-11-28T12:32:43+5:30

Gas problem home remedies : गॅस आणि ॲसिडीटीचा त्रास असह्य होतं, अंगावर काढणं तर धोक्याचंच.

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

खाण्यात जरा बदल झाला, तेलकट, पदार्थ खाल्ले की गॅस, एसिडीटीचा त्रास जाणवतो. (Gas Problem Solution) अनेकदा चहा प्यायल्यानंतरही काहींना एसिडीटी होते. काही लोकांना गॅस झाल्यानंतर लगेच डोक दुखायला लागतं. गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्याचे काही सोपे घरगुती उपाय पाहूया. यामुळे तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.(Gas problem home remedies celery ajwain hing asafoetida ginger lemon and baking powder)

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

गॅस आणि अॅसिडिटीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करू शकता. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर एक कप पाण्यात मिसळून प्या. त्यामुळे लवकरच आराम मिळेल.

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

जर गॅसची समस्या वाढत असेल तर तुम्ही यासाठी ओवा खाऊ शकता. अर्धा चमचा ओवा बारीक करून त्यात चवीनुसार काळे मीठ मिसळून पाण्यासोबत प्या. यामुळे त्वरित आराम मिळेल.

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

गॅसच्या समस्येमध्ये जिरे हे औषधापेक्षा कमी नाही, यासाठी तुम्ही एक चमचा अख्खे जिरे घ्या आणि 2 कप पाण्यात मिसळा आणि सुमारे 15 मिनिटे उकळा. पाणी थंड झाल्यावर ते प्या.

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

जेव्हा तुम्हाला गॅस असेल तेव्हा तुम्ही आल्याचे सेवन करू शकता, ते रामबाण औषधासारखे काम करते. तुम्ही त्याचा अनेक प्रकारे वापर करू शकता, जसे की आल्याचा चहा पिणे किंवा एक कप पाण्यात चिरलेले आले घालून ते उकळू शकता. पाणी थोडे कोमट झाले की प्यावे.

गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं? ५ उपाय, अपचनाचे त्रास होतील कमी

गॅसची समस्या खूप त्रास देते, यासाठी तुम्ही अर्धा चमचा हिंग घ्या आणि कोमट पाण्यात मिसळा आणि नंतर प्या. असे केल्याने पोटात गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होईल आणि मग तुमचे डोके दुखणार नाही.