Join us   

कॅन्सरचा धोका होईल कमी; रोज न चुकता ५ पदार्थ खा, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:39 PM

1 / 7
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये कोट्यावधी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. आकडेवारीनुसार ६ पैकी एक मृत्यू कॅन्सरने होतो. यात सगळ्यात जास्त संख्या ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची आहे. महिलांमध्ये या कॅन्सरचा धोका अधिक असतो. ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वाइकल कॅन्सरमुळे या आजाराचा धोका वाढतो. इंडिया अगेंस्ट कॅन्सरच्या आकडेवारीनुसार भारतात २७ लोक कॅन्सरवर उपचार घेत आहेत. (Best diet plan of 5 food for prevention of cancer and diseases experts advice)
2 / 7
वरिष्ठ डायटीशियन डॉ. रसिका माथुर (नानावटी मॅक्स रुग्णालय, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सर शरीरात अशावेळी हल्ला करतो जेव्हा इम्यून सिस्टीम कमकुवत असते. म्हणूनच महिलांनी आपल्या जीवनशैलीत बदल करून आहार व्यवस्थित घ्यायला हवा. इम्यूनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही जीवघेण्या कॅन्सरचा धोका टाळू शकता. (Good food for cancer Prevention)
3 / 7
सॅलेड - जेवणात सॅलेडचा समावेश करा. आहारात तुम्ही जितका जास्त फायबर्सचा समावेश कराल तितकीच तब्येत उत्तम राहील. फायबर्स नसलेले पदार्थ खाल्यानं पचन संथ गतीनं होतं.
4 / 7
रोजच्या आहारात बियायुक्त पदार्थांचा समावेश करा. आजकाल बाजारात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया उपलब्ध आहेत. भोपळा, आळशीच्या बीया, नाचणी, ज्वारी, बाजरी या पदार्थांचा आहारात समावेश करा. यातून तुम्हाला प्रोटीन्सबरोबर ओमेगा ३ सुद्धा मिळेल याशिवाय आजारांपासून दूर राहता येईल. वेगवेगळ्या पिठांमध्ये मिसळून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.
5 / 7
रोज दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. दूध, दही, ताक हे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात खायला हवेत यातून भरभरून प्रोटीन मिळतं. जर तुम्ही दूध, दही खाऊ शकत नसाल तर दोन्ही वेळच्या जेवणात दाळींचा समावेश करा. याशिवाय बेसनाचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता.
6 / 7
रोजच्या जेवणात पौष्टीक पदार्थ खाल्ल्यानं इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. आहारात रोज ड्राय फ्रुट्सचा समावेश करा, बदाम, अखरोड, खजूर या पदार्थांच्या सेवनानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
7 / 7
रंगेबिरंगी भाज्या, फळं एंटी ऑक्सिडेंट्सनी भरपूर असतात. याच्या सेवनानं आजारांपासून बचाव करणं सोपं होतं. या व्यतिरिक्त ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, जांभूळ, द्राक्ष, संत्री, किव्ही या पदार्थांचे रोज सेवन केल्यानं शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढता येते.
टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलआरोग्य