1 / 8व्यक्तिगणिक प्रत्येकाची झोपण्याची सवय आणि (Health benefits of sleeping on your left side) पद्धत वेगळी असते. कुणाला आहे त्या ठिकाणी बसल्या जागी कधीही - कुठेही झोप लागते. तर काहींना आपल्या नियमित जागेवरच झोप लागते. परंतु, झोपण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. शरीरातील कार्य योग्यरीत्या चालावे यासाठी योग्य पद्धतीने झोपणे महत्वाचे असते.2 / 8हेल्थलाईन या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ''जर आपल्याला आपण नियमित झोपत असलेल्या पोझिशनमध्ये नीट झोप लागत असेल तर, ती स्थिती आपल्यासाठी योग्य ठरू शकते. परंतु, एका अंगावर झोपणे अधिक योग्य असते. जर आपण डाव्या कुशीवर झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.''3 / 8आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असते आणि डाव्या बाजूला झोपल्याने हृदयावरील दाब कमी होतो, यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाते. 4 / 8 डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. पोटदुखी, अपचन, पोट बिघडणे, यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, डाव्या कुशीवर झोपा. यामुळे पचनक्रियेत बरीच सुधारणा होते. रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील आम्ल निर्मितीचे प्रमाण कमी होते ज्यामुळे अन्ननलिका साफ होण्यास मदत मिळते.5 / 8 बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर मानले जाते. असे केल्याने छातीत जळजळ, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.6 / 8डाव्या कुशीवर झोपल्याने श्वासनलिकेतून हवा अधिक मुक्तपणे वाहते, त्यामुळे घोरणे कमी होते. डाव्या कुशीवर झोपल्याने घसा आणि जिभेच्या ऊती सैल होत नाहीत, ज्यामुळे हवेचा प्रवाहात अडथळा येत नाही आणि घोरण्याचे प्रमाण कमी होते. 7 / 8गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर मानले जाते. डाव्या कुशीवर झोपल्याने रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि यामुळे गर्भाशयातील बाळाला पोषण देण्यास अधिक मदत होते. 8 / 8जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होते असेल किंवा झोप व्यवस्थित लागत नसेल तसेच झोपेसंबंधित अनेक समस्या असतील तर डाव्या कुशीवर झोपावे, यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारुन छान - चांगली झोप लागण्यास मदत होते.